प्रतिनिधी
मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या संभाजीनगरच्या सभेला पोलिसांनी अटी शर्ती घातल्या होत्या. त्या अटी शर्तींचे पालन होते की नाही याकडे काटेकोर लक्ष दिले होते. मात्र 12 पैकी 10 अटी शर्तींचे पालन झाले नाही म्हणून त्यांच्यावर संभाजीनगरात गुन्हा देखील दाखल केला होता. आता राज ठाकरे यांच्या सभेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. या वरूनच मनसेने शिवसेनेला डिवचले आहे. राजसाहेबांच्या सभेवर अटी-शर्ती लादल्या. मग मुख्यमंत्र्यांच्या “टोमणे सभेला” पोलिसांनी अटी शर्ती लादल्या आहेत का??, त्या कोणत्या अटी शर्ती आहेत?? असे खोचक सवाल मनसेचे नेते गजानन काळे यांनी ट्विटरवर केले आहेत. Terms and conditions to the Rajya Sabha, then how to free the Chief Minister’s “Tomane Sabha”
राज ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतल्याचे सभेतून दिसले आहे. तसेच मशिदींवरील भोंग्यांवरून राज ठाकरेंनी महाविकास आघाडीला अल्टिमेटम दिले. गुढीपाडव्याला झालेली सभा, ठाण्याची सभा आणि संभाजीनगर मधील सभा या तिन्ही सभांमध्ये राज ठाकरेंनी महाविकास आघाडी सरकारचे वाभाडे काढले.
राज ठाकरेंच्या या सभेनंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आपल्या जाहीर सभेची घोषणा केली आहे. १४ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही सभा होणार आहे. दरम्यान, काय द्यायचाय तो सवाल जवाब होऊनच जाऊ दे असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
मुख्यमंत्र्याच्या या सभेपूर्वीच मनसेने शिवसेनवर निशाणा साधला असून त्यांना डिवचल्याचे दिसून आले आहे. गजानन काळे यांनी या संदर्भात एक ट्विट केले आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंच्या सभेला “टोमणे सभा” असे म्हणत सेनेच्या या सभेवर निशाणा साधला आहे.
राजसाहेबांच्या संभाजीनगरच्या सभेला अनेक अटी, शर्ती मग शिवसेना पक्षप्रमुखांच्या टोमणे सभेला काही अटी, शर्ती आहेत का ? आमचं सरकार आलं की मशिदींवरील भोंगे,रस्त्यावरील नमाज बंद करणार हे बाळासाहेबांच स्वप्न हिंदुत्वाचा हुंकार म्हणत सभा घेणारे पूर्ण करणार का? असा सवाल उपस्थित केला आहे. इतकेच नाही तर त्यांनी या सभेला “टोमणे सभा” म्हणत त्या सभेला शुभेच्छा दिल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App