राज्यात उन्हाचा चटका, आणखी आठवडाभर पावसाची उघडीप; हवामान खात्याचा अंदाज

वृत्तसंस्था

मुंबई : राज्यात मुसळधार वृष्टी झाल्यानंतर पावसाने आता विश्रांती घेतली आहे. त्यामुळे उन्हाचा चटका वाढला आहे. अनेक शहरात त्याची जाणीव होत आहे. आणखी आठवडाभर पावसाची उघडीप राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. Temperature Increase Due To Rain Stopped; For another week there will be no rain in Maharashtra

श्रावण मास सुरु झाला आहे. त्यामुळे काही ठिकाणी श्रावणसरी कोसळण्याची शक्यता आहे. दरम्यान, कोकण विभागात मुंबईसह सर्वच ठिकाणी कमाल तापमान सुमारे २ ते ३ अंशांनी वाढले आहे. त्यामुळे उन्हाचा चटका वाढला आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागांमध्ये कमाल तापमानाचा पारा वाढल्याने ऐन पावसाळ्यात उकाडा जाणवतो आहे. राज्यात तुरळक ठिकाणी हलका शिडकावा वगळता आठवडाभर पावसाची विश्रांती राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.



ऑगस्टच्या सुरुवातीला पाऊस थांबला असला, तरी अनेक ठिकाणी आकाश अंशत: किंवा सामान्यत: ढगाळ  होते. त्यामुळे सर्वच ठिकाणी कमाल तापमान सरासरीच्या बरोबरीने २६ ते २८ अंशांपर्यंत होते.

मोसमी पावसाचा पट्टा आता हिमालयाच्या पायथ्याशी सरकत आहे. परिणामी पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे सूर्यकिरणे थेट जमिनीपर्यंत येत असल्याने तापमानात वाढ दिसून येत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार देशात १० ऑगस्टपासून पावसाचे प्रमाण कमी होणार आहे.

Temperature Increase Due To Rain Stopped; For another week there will be no rain in Maharashtra

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात