वृत्तसंस्था
पुणे : पिंपरी चिंचवड महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी आणि मानधनावरील, ठेकदारी पद्धतीच्या बहुतांश कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे दोन्ही डोस घेतले नाहीत. या कर्मचाऱ्यांनी २० जुलैपर्यंत लसीचे दोन्ही डोस घ्यावेत, अन्यथा जुलैचा वेतन स्थगित ठेवण्यात येईल, असा इशारा आयुक्त राजेश पाटील यांनी दिला आहे. Take both doses of corona vaccine, otherwise the salary is suspended; Warning to Pimpri Chinchwad Municipal Corporation employees
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आस्थापनेवर गट अ ते ड संवर्गात ७ हजार ४७९ अधिकारी, कर्मचारी काम करत आहेत. कोरोना प्रादुर्भव रोखण्यासाठी महापालिका स्तरावर विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. महापालिका अधिकारी कर्मचाऱ्यांचे आरोग्य निरोगी रहावे, कोरोनापासून संरक्षण मिळावे लसीकरण केंद्रे उभारली आहेत.
कोरोना प्रतिबंधक लस घेण्याबाबत तीन वेळा कळविले आहे. तरीही बहुतांशी अधिकारी कर्मचाऱ्यांनी लस घेतली नाही. शाखाप्रमुख, विभागप्रमुख यांनी आपल्या नियंत्रणाखालील सर्व अधिकारी कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी, मानधनावरील, ठेकदारी पद्धतीच्या बहुतांश कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जर लस घेतली नसेल तर त्यांनी ते २० जुलैपर्यंत घ्यावेत अन्यथा जुलैच वेतन स्थगित करण्याबाबत विचार करण्यात येईल ,असा इशारा राजेश पाटील यांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App