विशेष प्रतिनिधी
पुणे : पिंपळे गुरव येथील जलतरण तलाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडू आणि प्रशिक्षक यांच्या सरावासाठी २ फेब्रुवारीपासून खुला करण्यात आला आहे. त्याचबरोबर ५ फेब्रुवारीपासून ५० टक्के क्षमतेने सर्वांसाठी हा जलतरण तलाव खुला करण्यात आल्याची माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सहाय्यक क्रीडा आयुक्त सुषमा शिंदे यांनी दिली.Swimming pool at Pimple Gurav open to all from 5th February
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने चालविण्यात येणारे सर्व जलतरण तलाव बंद ठेवण्यात आले होते. राज्य शासन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार जलतरण तलाव सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
त्यानुसार महानगरपालिकेचा पिंपळे गुरव जलतरण तलाव ५० टक्के क्षमतेने सर्वांसाठी खुला करण्यात आला आहे. जलतरण तलावावर कोरोनाचे सर्व नियम पाळून तसेच कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस पूर्ण झाले आहेत याची खात्री करूनच प्रवेश देण्यात येईल, अशी माहितीही शिंदे यांनी दिली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App