सर्वसामान्य लोकांपासून राजकीय नेते तसेच चित्रपट सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी त्या दोघांवर टीका केली आहे. आता या वादात स्वरा भास्करने उडी घेतली आहे.Swara Bhaskar’s reaction to Vikram Gokhale’s statement “Padma Award is coming”
विशेष प्रतिनिधी
मुंबई : देशाला १९४८ मध्ये मिळालेले स्वातंत्र्य भीक होती, अभिनेत्री कंगना रणौत असं वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली. तिच्या या वक्तव्यानंतर देशभरातून तिच्यावर टीका होत होत्या.परंतु कंगनाच्या या वक्तव्याला आपला पाठिंबा असल्याचे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले म्हणाले.
दरम्यान आता कंगना आणि व्रिकम गोखले यांनी केलेल्या वक्तव्याला देशभरातून तीव्र विरोध केला जातोय. सर्वसामान्य लोकांपासून राजकीय नेते तसेच चित्रपट सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी त्या दोघांवर टीका केली आहे. आता या वादात स्वरा भास्करने उडी घेतली आहे.
आज अभिनेत्री स्वरा भास्करनेही ट्विट करून विक्रम गोखलेंवर जोरदार निशाणा साधलाय.यावेळी विक्रम गोखलेंनी कंगना रणौतला पाठिंबा दिल्याच्या वृत्ताचे ट्विट शेअर करत स्वराने “पद्म पुरस्कार येत आहे” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
Padma award coming up 🙏🏽🙏🏽🙏🏽 https://t.co/aB77GOQFNC — Swara Bhasker (@ReallySwara) November 15, 2021
Padma award coming up 🙏🏽🙏🏽🙏🏽 https://t.co/aB77GOQFNC
— Swara Bhasker (@ReallySwara) November 15, 2021
काय म्हणाले होते विक्रम गोखले
‘कंगना रनौत हीने केलेल्या वक्तव्याशी मी सहमत आहे. आपल्याला स्वातंत्र्य दिलं गेलं आहे. स्वातंत्र्यासाठी लढणारे योद्धे फासावर जात असताना मोठ्या लोकांनी त्यांना वाचवण्यासाठी काहीच केलं नाही, ते फक्त शांतपणे बघत राहिले,’ असं विधान विक्रम गोखलेंनी कंगनाच्या समर्थनार्थ केलं होतं.
पुढे गोखले म्हणाले की , “सध्या हिंदूंमध्ये जाणीवपूर्वक तेढ वाढवली जात आहे. आपण हे उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत. तरुण पिढीला गाफील ठेवण्यासाठी इतिहास बदलण्याचे षडयंत्र चालू आहे. या दुष्कृत्यांना आळा घालण्याची वेळ आली आहे. माझा देश भगवाच राहील, हिरवा कधीही होणार नाही. देश संकटाच्या उंबरठ्यावर असताना भाजप व शिवसेनेने एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी केले होते..
देशाचा इतिहास बाबरापासून सुरु होतो तो आणि छापला जातो हे दुर्दुैव आहे. बाबरापूर्वी कोणी नव्हते का? या देशाकरिता झटणारा हा माझा मुसलमान आहे, त्यात मी भेदाभेद करत नाही. माझ्या दृष्टीने बाबासाहेब या देशाला कळले नाहीत, आंबेडकर मोठे व्यक्तिमत्त्व होते. त्यांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही”, असेही विक्रम गोखले म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App