पुण्यातील दहीहंडी कार्यक्रमात हजेरी लावत, तरुणांना आहारविषयक सल्लाही दिला.
पुणे : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत भारताला कांस्यपदक मिळवून देणाऱ्या स्वप्निल कुसाळेंनी ( Swapnil Kusale ) हिंदू संस्कृती जपली पाहीजे असं विधान केलं आहे. पुण्यातील बालेवाडी-हिंजवाडीतील अमोल बालवडकर यांच्या दहीहंडीत कार्यक्रमाप्रसंगी त्यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांनी प्रतिक्रिया दिली.
स्वप्निल कुसाळे म्हणाले, ”आपलं हिंदू राष्ट्र पुढे गेलं पाहिजे. ते वाढलं पाहिजे. मी पहिल्यांदाच दहीहंडी उत्सवात सहभागी झालो आहे. आपण आपली हिंदू संस्कृती जपली पाहिजे. आपण जय श्रीराम..अशा घोषणा देतो. त्या पुढे गेल्या पाहिजेत. लहान मुलांनाही प्रोत्साहन दिलं पाहिजे,तरच आपलं हिंदू राष्ट्र आणखी मोठं होईल.”
याशिवाय यावेळी कुसाळे यांनी तरुणांना आहारविषयक सल्लाही दिला. पौष्टिक जेवण करण्याचे आवाहन केले आणि डायटबाबत सांगितले. ते म्हणाले, दहीहंडी सारखे खेळ खेळण्यासाठी मजबूत शरीरयष्टी आवश्यक आहे. एवढ्या उंचावर जाऊन दहीहंडी फोडणे कौतुकास्पद आहे. त्याला मेहनतही लागत असते. त्यासाठी तरुणांनी आहार चांगला घेणे आवश्यक आहे. बाहेरील खाणे टाळून घरातील पौष्टिक जेवण घ्यावे. तसेच यावेळी स्वप्नील कुसाळे यांचा नागरी सत्कारही केला गेला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App