मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसा यावरून महाराष्ट्राचे राजकारण तापलेले आहे. त्यात आज हनुमान जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि राष्ट्रवादीकडून पुण्यात हनुमानाच्या आरतीचे आयोजन करण्यात आले आहे.त्यावर विविध नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. भोंग्याचे राजकारण काय करायचे ते करा आम्हाला रात्रीची वीज दिवसा द्या असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी पुण्यातील पत्रकार परिषदेत म्हणाले. Swambhimani shetkari sanghtna leader Raju Shetti demanded farmer needs Day period sufficient power for agriculture work
विशेष प्रतिनिधी
पुणे : मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसा यावरून महाराष्ट्राचे राजकारण तापलेले आहे. त्यात आज हनुमान जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि राष्ट्रवादीकडून पुण्यात हनुमानाच्या आरतीचे आयोजन करण्यात आले आहे.त्यावर विविध नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. भोंग्याचे राजकारण काय करायचे ते करा आम्हाला रात्रीची वीज दिवसा द्या असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी पुण्यातील पत्रकार परिषदेत म्हणालेया पत्रकार परिषदेला प्रकाशतात्या बालवडकर,बापुसाहेब कारंडे उपस्थित होते.
शेतकऱ्यांना योग्य प्रकारे भाव मिळत नसल्याची भावना वयक्त करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शेट्टी म्हणाले, आम्ही महाविकास आघाडी सरकार मधून बाहेर पडलो आहे. सरकारने मागील दोन वर्षात राबविलेली धोरणे जनतेच्या, शेतकऱ्यांच्या हिताची नाही याबाबत लेखी पत्र महविकास आघाडी सरकार मधील वरिष्ठ नेत्यांना देऊनही त्यावर काही उत्तर मिळालेले नाही. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसात काँग्रेसने बाजी मारली याबाबत त्यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी सांगितले की, कोल्हापूर पोटनिवडणुकीत आम्ही कोणतीही भूमिका घेतली नव्हती.
कोण जिंकल हारले याने आम्हाला फरक पडत नाही.दोन्ही आघाड्यानी प्रचाराची खालची पातळी गाठली आहे. अशी टिका त्यांनी यावेळी महाविकास आघाडी व भाजपवर केली.एका निवडणूकीतून महाविकास आघाडीचा निष्कर्ष काढता येणार नाही.निवडणूक म्हटलं की कोणी जिंकत असतं कोणी हारत असतं हा मतदारसंघ हा शहरी होता ग्रामीण भागात काय कौल आहे हे बघावं लागेल.
राज्यात कोळशाचे संकट हे जाणवत आहे .त्यावर राजू शेट्टी म्हणाले,भारनियमनाचा सर्वाधिक फटका शेतीला.विजेचे वाटप करताना पक्षपात.इतरांना २४ तास वीज.शेतकऱ्यांना आठ तास रात्रीची वीज दिली जाते.आता त्यात ही कपात केलीये तीन तास वीज दिली जातेय.शेतकऱ्यांना वीज देत नसाल तर बिल का पैसे द्यावे लागतात. असासवाल राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला विचारला. मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसा यावरून महाराष्ट्रात हनुमान चालीसा वाजवा भोंगे याचे राजकारण सुरू आहे. त्यापेक्षा शेतकऱ्यांच्या समस्याकडे लक्ष द्या अशी मागणी राजू शेट्टी यांनी सरकारकडे केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App