स्वाभिमानाचे वीज मागणीचे आंदोलन पेटले; शेतकऱ्यांनी पेटविले महावितरणचे कार्यालय


वृत्तसंस्था

कोल्हापूर : स्वाभिमानाचे वीज मागणीचे आंदोलनाला हिंसक वळण लागले असून शेतकऱ्यांनी मध्यरात्री महावितरणचे कार्यालय पेटवून दिले आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा हा परिणाम मानला जात आहे.तसेच आज दिवसभरात राज्यामध्ये महावितरणाविरोधातील आंदोलनाचा भडका उडण्याची शक्यता शेतकरी संघटनेने व्यक्त केली आहे. Swabhimana’s power demand agitation ignited; Farmers set fire to MSEDCL office

शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरमध्ये महावितरण कार्यालयासमोर दोन दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. मात्र सरकार दुर्लक्ष करत असल्याच्या भावनेतून अज्ञात शेतकऱ्यांनी महावितरणाच्या कार्यालयाला आग लावल्याची घटना घडली.



मध्यरात्रीच्या सुमारास संतप्त अज्ञात शेतक-यांनी कागल येथील महावितरणच्या कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय पेटवले. प्रशासनाने छत्रपती शाहू साखर कारखान्याच्या अग्निशामक यंत्रणेची मदत घेत आग आटोक्यात आणली. या आगीमध्ये काही कागदपत्रं जळून खाक झाल्याची शक्यता व्यक्त केली जातेय. “शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलनाची तीव्रता वाढणार असल्याचा संघटनेकडून इशारा,” अशं ट्विटही संघटनेच्या ट्विटर हॅण्डलवरुन हा आग लावल्याचा व्हिडीओ पोस्ट करत देण्यात आला.

Swabhimana’s power demand agitation ignited; Farmers set fire to MSEDCL office

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात