प्रतिनिधी
पुणे : शरद पवारांनी 1978 मध्ये वसंतदादांचे सरकार पाडले होते. त्यावरून महाराष्ट्र सह देशात बराच राजकीय गदारोळ झाला होता. आज शरद पवारांच्या हस्ते पुण्यात महर्षी पुरस्कार स्वीकारताना माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी पवारांनी वसंतदादांचे सरकार पाडल्याची आठवण काढली!! Sushil Kumar shinde remembers backstabbing of vasantdada patil by sharad Pawar in 1978
सुशील कुमार शिंदे यांच्या राजकीय वाटचालीचा आढावा घेताना शरद पवारांच्या डोळ्यात पाणी आले, तर 1978 मध्ये वसंतदादांचे सरकार पाडले नसते, तर शरद पवार काय चीज आहे हे देशाला समजले नसते, असे उद्गार सुशीलकुमार शिंदे यांनी काढले.
मला कारस्थान करून मुख्यमंत्रीपदावरून काढले; सुशील कुमार शिंदेंची मनातली खदखद बाहेर!
पुण्याचे वरिष्ठ नगरसेवक आबा बागुल संयोजित पुणे नवरात्र महोत्सवाचा महर्षी पुरस्कार यंदा शरद पवार यांच्या हस्ते सुशील कुमार शिंदे यांना देण्यात आला. त्यावेळी दोन्ही नेते आपल्या राजकीय कारकीर्दीच्या जुन्या आठवणीत रंगून गेले होते. सुशील कुमार शिंदे यांना नोकरी सोडायला लावून विधानसभेचे तिकीट मिळवून देण्याचा प्रयत्न केल्याची आठवण पवारांनी सांगितली. परंतु, पहिला प्रयत्न यशस्वी झाला नाही. कारण बाबू जगजीवन राम यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्याने सुशील कुमार शिंदे यांच्या ऐवजी दुसऱ्या उमेदवाराची शिफारस करमाळा मतदार संघासाठी केल्याने आपला आणि वसंतदादांचा नाईलाज झाला. पण नंतर मात्र ती उमेदवारी देण्यात आपण यशस्वी झालो, असे पवारांनी सांगितले. सुशील कुमार शिंदे यांनी पवारांच्या राजकीय कर्तृत्व विषयी सांगताना 1978 सालचा वसंत दादा पाटील सरकार पाडल्याचा उल्लेख केला. वसंतदादांचे सरकार पवारांनी पाडले नसते, तर शरद पवार ही काय चीज आहे हे देशाला समजलेच नसते, असे उद्गार सुशीलकुमार शिंदे यांनी काढले.
– जुनी आठवण ताजी झाली
1978 मध्ये शरद पवार काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री होते. त्यांनी आपल्या चार सहकाऱ्यांसह राजीनामा देऊन वसंतदादांचे सरकार पाडले होते. त्या वेळच्या घटनेचे पवारांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला, असे वर्णन केले कित्येक वर्षे केले जात आहे. सुशील कुमार शिंदे यांनी आपल्या सत्काराच्या आणि महर्षी पुरस्कार स्वीकारण्याच्या निमित्ताने केलेल्या भाषणामुळे 1978 ची जुनी आठवण ताजी झाली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App