प्रतिनिधी / वृत्तसंस्था
मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाली आहे, असा खळबळजनक दावा कपूर रूग्णालयातील शवविच्छेदन गृहात प्रत्यक्ष शवविच्छेदनाच्या वेळी हजर असणारे कर्मचारी रूपकुमार शाह यांनी केला आहे. कोणत्याही चौकशी आणि तपास यंत्रणेने आपल्याला फोन करून विचारले, तर आपण सुशांत संबंधी सगळी माहिती तपास यंत्रणेला आणि अधिकाऱ्यांना सांगू, असेही संबंधित कर्मचाऱ्याने एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या बाईट मध्ये सांगितले आहे.sushant Singh Rajput case rises from grave; man who conducted autopsy claims ‘actor was murdered’
काय म्हणाले शाह?
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीनंतर यावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे. रुपकुमार शाह असे त्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. हत्या आणि आत्महत्या यात खूप फरक आहे. मृतदेह जेव्हा येतो तेव्हा ही हत्या की आत्महत्या हे लगेच कळते. सुशांतच्या मानेवर खुनाच्या खुणा होत्या, ते खुनासारखे दिसत होते. शरीरावर वार आणि जखमेच्या खुणा होत्या. आत्महत्या करणार्या व्यक्तीला ठोसे मारले जात नाहीत, असे शाह म्हणाले.
जब मैंने सुशांत सिंह राजपूत का शव देखा तो यह आत्महत्या का मामला नहीं लगा। उसके शरीर पर चोट के निशान थे। मैं अपने सीनियर के पास गया लेकिन उन्होंने कहा कि हम बाद में इस पर चर्चा करेंगे: रूपकुमार शाह, कूपर अस्पताल, मुंबई के मुर्दाघर सेवक,ठाणे, महाराष्ट्र pic.twitter.com/kmhCiBgWVu — ANI_HindiNews (@AHindinews) December 26, 2022
जब मैंने सुशांत सिंह राजपूत का शव देखा तो यह आत्महत्या का मामला नहीं लगा। उसके शरीर पर चोट के निशान थे। मैं अपने सीनियर के पास गया लेकिन उन्होंने कहा कि हम बाद में इस पर चर्चा करेंगे: रूपकुमार शाह, कूपर अस्पताल, मुंबई के मुर्दाघर सेवक,ठाणे, महाराष्ट्र pic.twitter.com/kmhCiBgWVu
— ANI_HindiNews (@AHindinews) December 26, 2022
#WATCH via ANI Multimedia | Sushant Singh Rajput case rises from grave; man who conducted autopsy claims ‘actor was murdered’https://t.co/Xw3ljWd5s5 — ANI (@ANI) December 26, 2022
#WATCH via ANI Multimedia | Sushant Singh Rajput case rises from grave; man who conducted autopsy claims ‘actor was murdered’https://t.co/Xw3ljWd5s5
— ANI (@ANI) December 26, 2022
सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्याच्या दाव्यावर शंका व्यक्त करताना शाह म्हणाले, सुशांत एक उत्तम अभिनेता होता. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले असून अशा व्यक्तीने आत्महत्या केली, तर आम्ही त्याचा मृतदेह व्यवस्थित हाताळू. हातपाय तुटलेला माणूस स्वतःला कसा लटकवू शकतो? यावरून मी आमच्या वरिष्ठांना ही आत्महत्या नसून हत्या आहे, असे दिसत असल्याचे सांगितले, मात्र त्यावेळी वरिष्ठांनी त्याकडे दुर्लक्ष केले, असेही शाह म्हणाले. शवविच्छेदन अहवाल लिहिण्याचे काम आपले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App