विशेष प्रतिनिधी
मुंबई – एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी वकील सुरेंद्र गडलिंग यांना मुंबई उच्च न्यायालयाने तात्पुरता सशर्त जामीन मंजूर केला. गडलिंग यांच्या दिवंगत आईच्या विधींबाबत हा जामीन न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने मंजूर केला.Surendra gadling get bail
गडलिंग यांना जून २०१८ मध्ये अटक करण्यात आली होती. या प्रकरणात जामीन मिळणारे ते दुसरे आरोपी आहेत. यापूर्वी कवी वरावरा राव यांना जामीन मिळाला आहे. गडलिंग यांच्या आईचे मागील वर्षी ऑगस्टमध्ये निधन झाले.
मात्र, त्यांचे काही विधी आणि शोकसभा अद्यापही झालेली नाही. वर्षपूर्तीच्या आधी हे विधी करायला हवेत. त्यामुळे जामीन मंजूर करावा, अशी मागणी त्यांनी अर्जाद्वारे केली होती. न्यायालयाने १३ ते २१ ऑगस्टपर्यंत त्यांना जामीन मंजूर केला आहे.
त्यांचे पारपत्र ‘एनआयए’कडे सुपूर्द करावे आणि सर्व दिवसांचा ‘एनआयए’कडे तपशील द्यावा, असे निर्देश दिले आहेत. तसेच ५० हजार रुपयांचे दोन हमीदार दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. तसेच स्थानिक पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App