Surekha Yadav : मराठमोळ्या सुरेखा यादव यांनी केलं ‘वंदे भारत एक्सप्रेस’चे सारथ्य; ठरल्या आशियातील पहिल्या महिला ‘लोको पायलट’

४५० किमी पेक्षा जास्त लांबचा प्रवास पूर्ण करून ट्रेन नियोजित वेळेच्या अगोदर पोहचवली.

प्रतिनिधी

मुंबई :  आशियातील पहिली महिला लोको पायलट सुरेखा यादव यांनी सोमवारी वंदे भारत एक्स्प्रेस चालवत आणखी एक पराक्रमाची स्वत:च्या नावावर नोंद केली. सेमी-हाय स्पीड वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन चालवणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. लोको पायलट सुरेखा यादव यांनी सोलापूर स्टेशन ते मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान सेमी-हाय स्पीड ट्रेन चालवल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. Surekha Yadav drove Vande Bharat Express Became Asia’s first woman loco pilot

माझी पहिली नियुक्ती १९८९ मध्ये झाली होती. तिथून आता मी वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये पोहचली आहे. मला सर्वांचेच पाठबळ मिळाले आहे. वंदे भारत एक्स्प्रेसला मुंबईत आणल्याबद्द्ल मी पंतप्रधान मोदींचे आभार मानते. अशी प्रतिक्रिया सुरेखा यादव यांनी दिली आहे.पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या सुरेखा यादव यांनी सोमवारी सोलापूर स्टेशन ते मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन चालवली. 450 किमी पेक्षा जास्त लांबचा प्रवास पूर्ण करून ट्रेन नियोजित वेळेच्या पाच मिनिटे आधी CSMT ला पोहोचली. त्या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात आला.

प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर १९८९ मध्ये त्या नियमित सहाय्यक चालक म्हणून रुजू झाल्या होत्या. सुरुवातीस त्यांची मालगाडीची चालक म्हणून नियुक्ती झाली होती. जिथे त्यांचे ड्रायव्हिंग कौशल्य आणखीनच सुधारले. २००० मध्ये त्यांना मोटर वुमन पदावर बढती मिळाली. २०१० मध्ये त्यांना पश्चिम घाट रेल्वे मार्गावर ट्रेन चालवण्याची संधी मिळाली. त्यानंतर २०११ मध्येच महिला दिनानिमित्त सुरेखा यांना आशियातील पहिली महिला ड्रायव्हर होण्याचा मान मिळाला होता.

Surekha Yadav drove Vande Bharat Express Became Asias first woman loco pilot

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात