विशेष प्रतिनिधी
मुंबई : शरद पवारांच्या राष्ट्रवादी नावाच्या प्रवृत्तीने संस्कार घडविलेल्या नेत्यालाच नैतिकता शिकवायची वेळ अखेर खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर आली. अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एका व्यक्तीमुळे 50 दिवस हेडलाईन मध्ये राहिली, याची तथाकथित खंत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.
नैतिकतेच्या आधारावर त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला. त्यासाठी धनंजय मुंडे यांना त्यांनी सोनिया गांधींचे उदाहरण शिकवले. हे सगळे भाजप किंवा काँग्रेस किंवा शिवसेनेच्या नेत्याच्या बाबतीत घडले नाही, तर शरद पवारांनी निर्माण केलेल्या राष्ट्रवादी नावाच्या प्रवृत्तीच्या “संस्कारांनी” घडविलेल्या नेत्याबाबतच घडले. किंबहुना घडवावे लागले.
संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती वाल्मीक कराड अटक झाल्यानंतर मुंडे यांच्या विरोधात भरपूर पुरावे समोर आले. अंजली दमानिया त्यांच्या पाठीशी हात धुवून लागल्या. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना सगळे पुरावे दिले. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढला. आता हे प्रकरण दिल्लीत गृहमंत्री अमित शाह हेच हाताळणारा का??, अशी वातावरण निर्मिती मराठी माध्यमांनी केली.
Sanjay Raut : मुंबईत स्वबळावर, महाराष्ट्रात इतरत्र आघाडी, संजय राऊत न्यांचा फॉर्मुला
पण आम्हाला नैतिकता आहे, ती इतरांनी शिकवू नये, असे वक्तव्य अजित पवारांनी केले. अजितदादांच्या वक्तव्यातला नैतिकतेचाच मुद्दा सुप्रिया सुळे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत पकडला धनंजय मुंडे यांच्यावर राखेतून पैसा मिळवण्याचा आणि शेल कंपन्यांमध्ये वळवण्याचा आरोप झाला. ऑफिस ऑफ प्रॉफिटचा हा मुद्दा बनला त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावर मंत्रीपदाबरोबरच आमदारकी गमवायची वेळ येऊन ठेपली.
या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी धनंजय मुंडे आणि अजित पवार यांना नैतिकतेच्या मुद्द्यावरून घेरले. ऑफिस ऑफ प्रॉफिट चा मुद्दा सोनिया गांधी यांच्या बाबतीत सुद्धा समोर आला होता. त्यावेळी तर त्या मंत्रिपदावर देखील नव्हत्या. परंतु नैतिकतेच्या मुद्द्यावर त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता. आपल्या एकट्यामुळे आपल्या पक्षाची 50 दिवस हेडलाईन होते, तर आपण दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्यावे म्हणून मी सुद्धा राजीनामा दिला असता, असा टोला सुप्रिया सुळे यांनी धनंजय मुंडे आणि अजितदादांना हाणला.
सुप्रिया सुळे यांना भाजप, शिवसेना किंवा काँग्रेस या कुठल्याही पक्षाच्या नेत्यांना नैतिकता शिकवावी लागली नाही, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी प्रवृत्तीच्या “संस्कारात” घडलेल्या नेत्यालाच नैतिकता शिकवावी लागली. हे त्यांच्या पत्रकार परिषदेचे वैशिष्ट्य ठरले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App