विशेष प्रतिनिधी
मुंबई : Supriya sule केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी पंतप्रधान पदाच्या मुद्द्यावर कुणाचेही नाव न घेता एका विशिष्ट नेत्याला पुरते “एक्सपोज” केले, पण तरीही खासदार सुप्रिया सुळे यांचे गडकरी प्रेम पुन्हा उफाळले!!
नागपूर मध्ये एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी पंतप्रधान पदाचा किस्सा सांगितला. लोकसभा निवडणुकीआधी एका नेत्याने मला पंतप्रधान पदासाठी पाठिंबा देण्याची ऑफर दिली होती, पण मीच त्यांना विचारले, तुम्ही मला पाठिंबा का देता आणि मी तरी तुमचा पाठिंबा का घेऊ?? मी तत्वाशी आणि पक्ष संघटनेशी एकनिष्ठ आहे. Supriya sule
JP Nadda : जेपी नड्डा यांनी निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र भाजपला केले सावध
पंतप्रधान बनणे हे काही माझे जीवन ध्येय नाही. त्यामुळे मी तुमचा पाठिंबा घेण्याचा प्रश्नच नाही, असे गडकरींनी सांगितले. त्याचवेळी त्यांनी त्या नेत्याचे नाव सांगणार नाही, असे स्पष्ट केले. परंतु, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नितीन गडकरी यांच्या विषयी कोणाचे प्रेम केव्हा उफाळून येते हे महाराष्ट्राच्या जनतेला पक्के माहिती आहे. शरद पवारांनी अनेकदा आपले गडकरी प्रेम उघडपणे व्यक्त केले आहे. पण त्या मागे गडकरी प्रेम कमी आणि फडणवीस द्वेष जास्त आहे हे उघड गुपित देखील अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. Supriya sule
या पार्श्वभूमीवर नितीन गडकरींच्या पंतप्रधान पदाबाबत खासदार सुप्रिया सुळे यांचे गडकरी प्रेम आज पुन्हा उफाळून आले. गडकरींच्या नागपुरातला वक्तव्यासंदर्भात त्यांना प्रश्न विचारल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी गडकरी पंतप्रधान झाले, तर आम्हाला आनंदच होईल, असे वक्तव्य केले. त्याचवेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. नितीन गडकरी हे विकासात राजकारण आणत नाहीत आणि गलिच्छ राजकारण करत नाहीत, असा टोमणा सुप्रिया सुळे यांनी मारला. या टोमण्यातूनच त्यांच्या गडकरी प्रेमापेक्षा फडणवीस द्वेष दिसून आला. Supriya sule
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App