प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अध्यक्ष पदापासून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे राज्यात खळबळ माजली. कार्यकर्त्यांच्या नाराजीमुळे शरद पवारांनी त्यांच्या निर्णयावर पुन्हा विचार करण्यासाठी ३ दिवसांची वेळ मागून घेतली, मात्र दुसऱ्याच दिवसापासून माध्यमांमध्ये अध्यक्षपदासाठी सुप्रिया सुळे यांचे नाव चर्चेत येऊ लागले. मात्र त्यांच्या नावाला पवार कुटुंबातूनच विरोध होऊ लागला आहे. Supriya Sule is busy with MP work, hence Atya Saroj Patal’s opposition to her post as NCP president.
या सर्व घडामोडींवर बुधवारी, ३ मे रोजी खासदार शरद पवार यांच्या मोठ्या बहिण सरोज पाटील यांची शरद पवार यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असावा यावरही भाष्य केले. सरोज पाटील म्हणाल्या, काल ही बातमी समजल्यानंतर माझ्यासाठी हा धक्काच होता. सुरुवातीला मला दु:ख वाटले.
अजितदादा – सुप्रिया अशी वाटणी झाली, तर सुप्रिया सुळे राष्ट्रीय राजकारणात करतील तरी काय??
पण, नंतर मी विचार केला कोणतीही संस्था टीकवायची असेल तर आपल्यानंतर तेथे सक्षम असे सेवक असायला हवेत. यासाठी नि:स्वार्थी माणसे असायला हवेत. पुढची तीन वर्ष शरद पवार काम करु शकतील. त्यामुळे आत्ताच त्यांनी अध्यक्ष पदावर योग्य व्यक्ती बसवली तर पुढील ३ वर्षात तो तयार होईल. यामुळे मला हा निर्णय योग्य वाटतो.
शरद पवार यांनी अध्यक्षपद सोडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस जातीयवादी पक्षासोबत तडजोड करेल का? या प्रश्नाला उत्तर देताना सरोज पाटील म्हणाल्या, शरद पवार जोपर्यंत आहे तोपर्यंत असे काही होईल असे मला वाटत नाही. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोणाची निवड व्हावी? राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण व्हावा यावरही पाटील यांनी आपल मत मांडले.
मला असे वाटते पुढचा राष्ट्रीय अध्यक्षपद हे जयंत पाटील यांना द्यायला पाहिजे. ते अभ्यासू आहेत, ते फॉरेन रिटर्न आहेत. तिथला त्यांचा इकॉनॉमिक्स आणि राज्यशास्त्राचा अभ्यास चांगला आहे. त्यांचे व्यक्तीमत्व खूप चांगले आहे फक्त त्यांनी जरा स्पीडमध्ये काम करायला पाहिजे, असे मत सरोज पाटील यांनी व्यक्त केले.
अजित पवार त्या पदावर बसले तर राज्यात बाकीची काम कोण करणार, सुप्रिया सुळे यांच्या संदर्भातही पाटील यांनी आपले मत मांडले. पाटील म्हणाल्या, सुप्रिया सुळे काम करू शकेल पण ती खासदार आहे, तिचा व्याप मोठा आहे. पण, तिला घरचे सगळे बघाव लागते, त्यामुळे सुप्रिया सुळे यांना देऊ नये असे मला वाटते असेही पाटील म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App