राहुल गांधींकडून वीर सावरकर यांचा अवमान; लखनौ न्यायालयाचे चौकशीचे आदेश

प्रतिनिधी

लखनौ : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी नुकतीच भारत जोडो यात्रेत काढली स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर जाणीवपूर्वक टीका केली. त्यामुळे त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने या प्रकरणाची सीआरपीसी २०२ (१) अंतर्गत चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. न्यायाधीश अंबरीश कुमार श्रीवास्तव यांनी या प्रकरणी सुनावणी 6 जूनपर्यंत स्थगित केली आहे. यावेळी न्यायालयाने हजरतगंज पोलिसांना या प्रकरणाचा एका महिन्यात तपास करून तो अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. Vir Savarkar insulted by Rahul Gandhi

न्यायालयाने हजरतगंजच्या पोलीस ठाण्याच्या प्रभारींना या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षकाकडून करून घेण्याचा आदेश दिला आहे. हा आदेश देताना न्यायालयाने सांगितले की, या प्रकरणाकडे पाहता राहुल हे दिल्लीत राहणारे आहेत आणि त्यांनी वीर सावरकर यांचा अवमान महाराष्ट्रातील अकोला शहरात केला आहे. ही दोन्ही ठिकाणे न्यायालयाच्या कक्षेबाहेरील आहेत, त्यामुळे पोलिसांनी तपास करणे गरजेचे आहे. सेंट्रल बार असोसिएशनचे माजी सरचिटणीस नृपेंद्र पांडे यांनी ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेच्या माध्यमातून पांडे यांनी या प्रकरणाचा चौकशीचा अहवाल सादर करण्यात यावा, अशी मागणी केली.


Rahul Gandhi : काठमांडूत राहुल गांधी मैत्रिणीच्या लग्नाच्या पार्टीत सामील; काँग्रेस कडून खुलासा!!


भारत जोडो यात्रेच्या वेळी राहुल गांधी यांनी जाणीवपूर्वक कट रचून १७ नोव्हेंबर २०२२ रोजी महाराष्ट्रातील अकोला येथे वीर सावरकर यांचा अवमान केला. राहुल गांधी हे समाजात विसंवाद निर्माण करण्यासाठी सशस्त्र क्रांतीचे स्फूर्तीस्थान असलेले वीर सावरकर यांच्यावर जाहीर व्यासपीठावरून सातत्याने टीका करत असतात. राहुल गांधी हे स्वातंत्र्यसैनिकांचा सातत्याने अवमान करत असतात. राहुल गांधी हे वीर सावरकर यांना ब्रिटिशांचे पेन्शनर, ब्रिटिशांचे नोकर, मदतनीस आणि कारगृहातून सुटका व्हावी यासाठी माफी मागणारे, अशी टीका करत असतात, असे केंद्रीय बार असोसिएशनचे माजी सरचिटणीस नृपेंद्र पांडे यांनी हा खटला दाखल करताना म्हटले आहे.

Vir Savarkar insulted by Rahul Gandhi

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात