विशेष प्रतिनिधी
जामखेड : राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या शरद पवार गटामध्ये राज्य पातळीवरील नेतृत्वावरून सुप्त वाद आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील विरुध्द राेहित पवार संघर्ष असल्याचे म्हटले जाते. मात्र, आता सुप्रिया सुळे Supriya sule यांनी राेहित पवार यांना राज्य पातळीवरील नेता म्हणून चमकविण्याची तयारी सुरू केली आहे.
कर्जत जामखेड मतदारसंघातील कार्यक्रमात सुळे म्हणाल्या प्रत्येकाच्या सुख-दुखात पहिला पोहोचणारा कोण असेल, तर महाराष्ट्रात रोहित पवार आहे. चंद्रावरून कुणी आले ना, तरी तुलाच मतदान मिळणार आहे. यावेळी रामकृष्ण हरी वाजवा तुतारी. तुतारीच इथे वाजणार आहे. तो सगळे दिवस बाहेर असतो. कुठे आंदोलन झाले, पहिला रोहित पोहोचतो. कुणी उपोषणाला बसले, तो तिथे पोहोचतो. प्रत्येकाच्या सुख-दुखात पहिला पोहोचणारा कोण असेल, तर महाराष्ट्रात रोहित पवार आहे, हे सांगायला मला प्रचंड आनंद होतोय.
Narendra Modi : ‘कीव’मध्ये पंतप्रधान मोदींचे जोरदार स्वागत, राष्ट्राध्य झेलेन्स्कींशी विशेष भेट
सुळे म्हणाल्या, रोहित माझ्या भावाचा मुलगा आहे म्हणून नाही. रोहितने स्वतःची ओळख महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात करून दाखवली आहे. प्रचंड कष्ट करतो. त्याची बायको इथे बसलीये. बायकोला फक्त स्टेजवर आणि टीव्हीवरच दिसतो. घरात तर मला कधी दिसत नाही तो.
रोहित पवारांच्या पत्नी कुंती यांना उद्देशून सुळे म्हणाल्या, कुंती, तुझी ओळख आहे की नाही रोहितशी. आता पोरं म्हणत असतील की, हा कोण पाहुणा आपल्या घरी येतो. त्याला मी सांगितलं कुंतीसाठी घरी नको जाऊ, पण पोरांसाठी जा. वडिलांची पण जबाबदारी मोठी असते. ज्या पद्धतीने त्याने पूर्ण आयुष्य कर्जत-जामखेड आणि महाराष्ट्राच्या मायबाप जनतेसाठी… तो पूर्ण वेळ देतो. याचा आम्हाला अभिमान आहे. जशा रोहितकडून तुमच्या अपेक्षा आहेत. तशा आमच्याही त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत. त्याने थोडासा वेळ आमच्या नातवंडांसाठी द्यावा, ही माझी त्याच्याकडून अपेक्षा आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App