मराठा आंदोलकांनी पेटविले अजितदादांच्या आमदाराचे घर, जाळली त्यांची गाडी; सुप्रिया सुळेंनी मागितला फडणवीसांचा राजीनामा!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागून मराठा आंदोलकांनी अजितदादा गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांचे माजलगावतले घर जाळले. त्यांची गाडी पेटवली, पण त्या कथित अपयशाचा ठपका सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर ठेवून त्यांचा राजीनामा मागितला. Supriya Sule demanded Fadnavis’ resignation

मनोज जरांगे पाटलांचे उपोषण सहाव्या दिवशी पोहोचताच मराठा आंदोलकांनी माजलगावात अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांचे घर पेटविले. त्यांच्या घरावर दगडफेक केली. पोर्चमध्ये उभी असलेली त्यांची गाडी जाळली. त्यावेळी प्रकाश सोळंके घरातच होते.

मराठा आंदोलन हिंसक होत असल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटलांना समज दिली. मराठा आंदोलन भरकटत आहे. त्याला गालबोट लागत आहे, असा इशारा मुख्यमंत्री शिंदेंनी दिला. त्यावर मराठा आंदोलकांमध्ये बराच खल झाला. प्रकाश सोळंके यांनी मराठा आंदोलकांच्या विरोधात कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. आपण मराठा आरक्षणाच्या बाजूनेच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परंतु त्यांच्या जुन्या व्हायरल व्हिडिओवरून ऑडिओवरून त्यांचे घर जाळून मराठा आंदोलकांनी त्यांची गाडी पेटवली. मनोज जरांगे पाटलांनी प्रकाश सोळंके यांनाच दोष देत प्रकाश सोळंके इथून पुढे सोसायटीच्या निवडणुकीत देखील निवडून येणार नाहीत, असा इशारा दिला. मराठा आमदार खासदारांचे राजीनामा नाट्यही दरम्यानच्या काळात रंगले.

मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलकांनी सगळा राग भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि विशेषतः अजितदादांची राष्ट्रवादी यांच्यावर काढला. मराठा आंदोलक शरदनिष्ठ राष्ट्रवादी विरुद्ध चकार शब्द काढत नाहीत. गेल्या दोन दिवसांपासून मराठा आंदोलक अजित पवार आणि त्यांच्या आमदारांनाच राजकीय दृष्ट्या टार्गेट करत आहेत.

या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलनाचा सगळा ठपका खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ठेवत अजितदादांच्या आमदाराचे घर जाळणे आणि गाडी पेटवणे हे गृहमंत्र्यांचे अपयश आहे. त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.

Supriya Sule demanded Fadnavis’ resignation

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub