विशेष प्रतिनिधी
मुंबई : सध्याच्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे आणि संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य संशयित वाल्मीक कराड यांच्यासारख्या प्रवृत्तींना पोसले शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस नावाच्या प्रवृत्तीनेच, पण आता खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार जितेंद्र आव्हाड सवाल करतायेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना!!
धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी सातत्याने चालविला आहे हे सुरेश धस देखील मूळ राष्ट्रवादी काँग्रेसच्याच प्रवृत्तीचे आहेत. पण त्या पलीकडे जाऊन धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड हे वर्षानुवर्षे शरद पवारांच्या अखंड राष्ट्रवादीत होते. त्यांचे आतापर्यंतचे सगळे राजकारण समाजकारण आणि अर्थकारण पवारांच्या राष्ट्रवादी नावाच्या प्रवृत्तीने पोसले. बीड जिल्ह्यात त्यांच्या राजकारणाचे भरण पोषण केले.
पण संतोष देशमुख प्रकरणात मात्र खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनाच धारेवर धरले. फडणवीस सरकार मधले उपमुख्यमंत्री आणि धनंजय मुंडे यांचे सध्याचे नेते अजित पवार यांना सोडून दिले.
वाल्मीक कराडच्या सगळ्या आर्थिक नाड्या आवडल्यानंतर त्याला शरण यावे लागले मात्र सुप्रिया सुळेंना “शरण” शब्द आवडला नाही. वाल्मीक कराडला अटक व्हायला हवी होती. बीड जिल्ह्यामध्ये जे काही घडले, ते महाराष्ट्राच्या सध्या सुसंस्कृत राजकारणासाठी शोभनीय नव्हते. आता मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी त्यामध्ये आपण चर्चा करून महाराष्ट्रात बीड जिल्ह्यात घडलेले प्रकार पुन्हा घडू नयेत याची दक्षता घ्यावी, असा उपदेश सुप्रिया सुळे यांनी केला.
जितेंद्र आव्हाड यांनी वाल्मीक कराड शरण येण्यापूर्वी सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट लिहून त्याच्या शरणागती संदर्भात कमेंट केल्या. वाल्मीक कराड शरण येण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांच्यात पडद्यामागे नेमके काय घडले??, असा सवाल संभाजीराजे यांनी केला. पण संभाजीराजे आणि जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांकडे बोट दाखविले नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App