विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या राजकीय जुगलबंदीचे विसंवादी सूर आत्तापर्यंत वेगवेगळ्या नेत्यांमध्ये वाजत होते, ते आता पवार घरातच वाजू लागले आहेत.Supriya gets elected from Baramati because of Ajitpawar says mitkari
खासदार सुप्रिया सुळे यांनी इंडिया टुडे कन्क्लेव्ह मध्ये दिलेल्या मुलाखतीतून त्याचे पडसाद उमटले. अजित पवारांनी बंड केल्यानंतर शरद पवारच नव्हे, तर शरद पवारांच्या बाकीच्या भावांनीही अजितदादांना दूर केल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. त्याच वेळी 85, 84 आणि 75 – 76 अशी वये असणाऱ्या भावांनी शरद पवारांना लढायचं हेच सांगितले, असेही त्या म्हणाल्या.
अजित पवारांच्या बंडाला आपला पाठिंबा नाही. त्यांचा आपल्या राष्ट्रवादीशी काहीही संबंध नाही, असे शरद पवारांनी याच इंडिया टुडेच्या कन्क्लेव्हमध्ये सुप्रिया सुळे यांच्या आधी मुलाखत देताना सांगितले. त्यावर सुप्रिया सुळे यांनी शिक्कामोर्तब करून पवारांच्या भावांना देखील त्यांच्या लढाईत जोडून घेतले.
पण एकीकडे सुप्रिया सुळे यांची ही राजकीय मशक्कत सुरू असताना अजितनिष्ठ राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी मात्र बारामती मतदारसंघातले राजकीय रहस्यच उघड केले. अजित पवारांसारखा भाऊ भक्कमपणे पाठीशी उभा राहत असल्यामुळे सुप्रिया सुळे बारामतीतून लोकसभेवर निवडून येतात, असे वक्तव्य अमोल मिटकरी यांनी केले.
त्यामुळे एकीकडे पवारांच्या भावांना बरोबर घेऊन अजितदादांशी पंगा घेण्याची सुप्रिया सुळेंची भाषा आणि दुसरीकडे बारामतीतून निवडून येण्यासाठी अजित पवारांच्याच मदतीची अपेक्षा, अशी पवार कुटुंबाच्या दुहेरी राजकारणाची चुणूक या निमित्ताने बाहेर दिसली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App