शिखर धवनचा आयेशा मुखर्जीपासून घटस्फोट; पत्नीने मानसिक छळ केल्याचे कोर्टाने केले मान्य; मुलाच्या ताब्याबाबत अद्याप निर्णय नाही
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : दिल्लीच्या कौटुंबिक न्यायालयाने बुधवारी क्रिकेटपटू शिखर धवनला आयशा मुखर्जीसोबत घटस्फोटाला मान्यता दिली. आयशाने धवनचा मानसिक छळ केल्याचे कोर्टाने मान्य केले. कोर्टाने घटस्फोट याचिकेतील धवनचे आरोप या आधारावर स्वीकारले की, पत्नीने विरोध केला नाही किंवा स्वत:चा बचाव करण्यात अपयशी राहिली. धवन आयशापेक्षा १० वर्षे लहान आहे.Shikhar Dhawan’s Divorce From Ayesha Mukherjee; Court accepts that wife inflicted mental torture; Child custody has not yet been decided
न्या. हरीशकुमार यांनी मान्य केले की, मुलापासून धवनला एक वर्ष लांब ठेवून त्याला मानसिक त्रास सहन करण्यास बाध्य केले. मात्र, न्यायालयाने मुलाच्या कस्टडीवर निर्णय दिला नाही. धवन भारत व ऑस्ट्रेलियात मुलासोबत पुरेसा वेळ घालवू शकतो. त्याला व्हिडिओ कॉल करू शकतो. कोर्टाने सांगितले की, याचिकाकर्ता प्रतिष्ठित खेळाडू व देशाचा अभिमान आहे. जर त्याने भारत सरकारकडे मदत मागितली तर ऑस्ट्रेलिया सरकारकडून मुलाची कस्टडी किंवा भेटीच्या हक्कासाठी मदत करायला हवी. धवनच्या याचिकेनुसार, आयशाने आधी त्याच्यासोबत भारतात येऊन राहण्याचे सांगितले होते. मात्र, आधीच्या पतीसोबतच्या प्रतिबद्धतेमुळे तिने शब्द फिरवला. पहिल्या लग्नापासून तिला दोन मुली आहेत. ती मुलींना घेऊन ऑस्ट्रेलियातच राहिल असा शब्द तिने पहिल्या पतीला दिला होता. यालाही कोर्टाने धवनचा मानसिक छळ म्हटले. धवनविरोधात भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाचे सदस्य व सोबतच्या खेळाडूंना अवमानकारक संदेश पाठवण्याचा आरोपही सिद्ध झाला. मात्र, आयशाने दावा केला होता की, तिने फक्त तीन जणांना असे संदेश पाठवले होते, मात्र कोर्टाने ते मान्य करण्यास नकार दिला. कोरोना काळात तो वडिलांसोबत राहू इच्छित होता, त्यावरून आयशाने भांडण केले हा आरोपही कोर्टाने मान्य केला. आयशाविरोधातील हा आरोपही सिद्ध झाला की, ती मुलासोबत भारतात आली असता तिच्या मुलींना खर्च पाठवण्यास धवनला बाध्य केले. शाळेची फीदेखील धवनला द्यावी लागली. अनेक दिवस धवनने सुमारे १० लाख रुपये दरमहा पाठवले.
आंतरराष्ट्रीय पातळीची किकबॉक्सिंग चॅम्पियन आहे आयशा मुखर्जी
आयशा मेलबोर्नची माजी किकबॉक्सर आहे. तिने बॉक्सिंगमध्ये राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दोन्ही पातळ्यांवर यश मिळवले. ती मूळ अँग्लो-इंडियन आहे. तिची आई ऑस्ट्रेलियाची तर वडील बंगाली आहेत. तिने बळजबरी दबाव टाकत ऑस्ट्रेलियात धवनच्या तीन मालमत्तेत ९९% मालकी हक्क मिळवल्याचे कोर्टाला आढळून आले. तसेच दोन इतर मालमत्तेतही ती भागीदार झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more