Supreme court : शरद पवारांना सुप्रीम कोर्टाचा झटका; घड्याळ चिन्ह गोठवायला नकार!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना आज सुप्रीम कोर्टाने झटका दिला. त्यांच्या पक्षाने घड्याळ चिन्ह गोठवावे, असा अर्ज केला होता. परंतु तो सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावला. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह कायम राहणार आहे.

शरद पवारांच्या पक्षाने निवडणूक आयोगाकडे तुतारी वाजविणारा माणूस आणि पिपाणी या दोन चिन्हांबद्दलही तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यापैकी एक तक्रार निवडणूक आयोगाने मान्य केली. तुतारी वाजवणारा माणूस लहान आणि अस्पष्ट दिसतो. तो ठळक करून त्याची उंची वाढवावी, ही शरद पवारांच्या पक्षाची मागणी निवडणूक आयोगाने मान्य केली. परंतु पिपाणी चिन्ह कोणाला देऊ नये, ही पवारांच्या पक्षाची मागणी निवडणूक आयोगाने मान्य केली नाही. कारण तुतारी वाजवणारा माणूस आणि पिपाणी ही दोन्ही चिन्हे स्वतंत्र आणि वेगळी आहेत, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे मूळ घड्याळ चिन्ह गोठवावे, अशी मागणी करणारा अर्ज शरद पवारांच्या पक्षाने त्या आधीच सुप्रीम कोर्टात केला होता. त्यावर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर सुप्रीम कोर्टाने घड्याळ चिन्ह गोठवायला नकार दिला. सुप्रीम कोर्टाने होकार देऊन घड्याळ चिन्ह गोठविले असते, तर अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेससाठी नवे चिन्ह घ्यावे लागले असते. परंतु, आता त्यांच्या पक्षाकडे घड्याळ चिन्ह कायम राहणार आहे.

Supreme court rejected pawar plea to freeze alarm clock symbol

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात