वृत्तसंस्था
नवी दिल्ली : शिवसेना नेमके कोणाची ठाकरेंची की शिंदेंची?? महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाबाबत सुप्रीम कोर्टात बुधवारी पहिली सुनावणी झाली आहे. शिंदे गट आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या वकिलांनी युक्तिवाद पूर्ण केल्यानंतर आजच्या दिवसाची सुनावणी पूर्ण झाली आहे. या प्रकरणावर उद्या गुरुवारी सकाळी पुन्हा एकदा सुनावणी होऊन, त्याबाबतचा निकाल येणे अपेक्षित आहे. त्यामुळे आता उद्याच्या सुनावणीकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. Supreme Court may give verdict on Thursday about power straggler in Shivsena Thackeray and shinde groups
बुधवारी झालेल्या सुनावणीत शिंदे गटाचे वकील हरीश साळवे, महेश जेठमलानी, तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीन कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी यांनी जोरदार युक्तिवाद केले आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने युक्तिवादात शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे.
मूळ शिवसेनेवर हक्क नाही : सिब्बल
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून कपिल सिब्बल यांनी दोन तृतीयांश आमदारांचा गट हा मूळ पक्षावर दावा करू शकत नाहीत, असे म्हटले आहे. राज्यघटनेतील परिशिष्ट 10 चा दाखला देत सिब्बल यांनी हा युक्तिवाद केला आहे. परिशिष्ट 10 मध्ये म्हटल्याप्रमाणे दोन तृतीयांश आमदारांनी दुस-या पक्षात विलीन होणे किंवा नवीन पक्ष स्थापन करणे योग्य असल्याचा युक्तिवाद सिब्बल यांनी केला आहे. त्यामुळे शिंदे गटाचा मूळ शिवसेनेवर कोणताही हक्क नसल्याचे सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादात म्हटले आहे.
पक्षांतरबंदीबाबत निर्णयाचा अधिकार अध्यक्षांना : साळवे
शिंदे गटाच्या वकिलांनी देखील या युक्तिवादाला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. उद्धव ठाकरे हे बहुमत चाचणीला सामोरे गेले नाहीत. म्हणजेच त्यांनी बहुमत गमावले असल्याचा युक्तिवाद महेश जेठमलानी यांनी केला आहे. तसेच पक्षांतरबंदी कायद्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार हा लोकसभा अध्यक्षांना आहे. त्यामुळे याबाबत सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करू नये, असे शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांनी न्यायालयात सांगितले आहे. त्यामुळे हे युक्तिवाद ऐकल्यानंतर सुप्रीम कोर्ट यावर काय निर्णय देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App