विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना आमदार अपात्र प्रकरणावर आता 10 जानेवारी 2024 ला निकाल जाहीर होणार आहे. सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना 31 डिसेंबर 2023 पर्यंत या प्रकरणावर निकाल जाहीर करण्याची मुदत दिली होती. त्यानुसार विधानसभा अध्यक्षांनी या प्रकरणी सुनावणी घेतली. Supreme Court extension of term to Assembly Speaker
विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटांचा युक्तिवाद ऐकून दोन्ही पक्षांची बाजू समजून घेतली. दोन्ही गटांच्या आमदारांची उलटसाक्ष देखील नोंदविली. त्यानंतर आता सुनावणी अंतिम टप्प्यावर आली आहे. असे असताना विधानसभा अध्यक्षांनी सुप्रीम कोर्टात अर्ज केला. या प्रकरणावर निकाल जाहीर करण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत मागितली. सुप्रीम कोर्टाने तीन आठवडे न देता 10 दिवसांची मुदतवाढ दिली.
विधानसभा अध्यक्षांच्या तीन आठवड्यांच्या मुदतवाढच्या मागणीवर सुप्रीम कोर्टाने तेवढी मुदतवाढ देऊ शकत नाही, असे स्पष्ट सांगितले. पण 10 जानेवारीपर्यंत अंतिम निकाल जाहीर व्हायला हवा, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले.
राहुल नार्वेकर नेमकं काय म्हणाले?
राहुल नार्वेकर यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांदरम्यान महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर 10 जानेवारी 2024 रोजी निकाल घोषित करणार आहे. आमदार अपात्रतेबाबत ऐतिहासिक निकाल देणार, हे देशासाठी उदाहरण असेल, अशी प्रतिक्रिया राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App