वृत्तसंस्था
पालघर : मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी ५०० रुपयांचे कर्ज घेतलेल्या वडिलांनी छळाला कंटाळून आत्महत्या केली. मानवतेला लाजवेल अशी घटना पालघरमध्ये घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले.Suicide after harassment of father who borrowed Rs 500 for his son’s funeral; Incidents that embarrass humanity in Palghar
आदिवासी काळू पवार यांना मारहाण करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली रामदास कोरडे याला पोलिसांनी रविवारी अटक केली.आदिवासी काळू पवार यांच्या मुलाचे गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये निधन झाले होते, त्यांच्याकडे त्यांच्या मुलाचे अंत्यसंस्कार करण्यासाठी पैसे नव्हते.
त्याने रामदास कोरडेकडून ५०० रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्ज फेडले नाही. त्यामुळे त्याला शेतमजूर म्हणून कामाला जुंपले. त्याने वेतन मागितले म्हणून मारहाण सुद्धा केली जात होती. यामुळे दुःखात बुडालेल्या पवार यांनी आत्महत्या केली.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपी रामदास कोर्डे याला अटक करून गुन्हा दाखल केला. पवार यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून रामदास कोर्डे यांच्यावर विविध कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात वेठबिगारीस लावल्याचा गुन्ह्याचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App