विशेष प्रतिनिधी
मराठवाडा : मराठवाडा म्हटलं की दुष्काळी भाग हेच आपल्या डोळ्यासमोर येते. पण अलिकडे ही परिस्थिती बदलली आहे. मागील 3-4 वर्षांपासून होत असलेल्या पावसामुळे येथील चित्र बदलले आहे. उसाच्या लागवडीमध्ये आणि ऊस गाळपासाठी आवश्यक असलेल्या साखर कारखान्यांच्या संख्येमध्ये देखील वाढ झालेली आहे.Sugarcane cultivation increased in Marathwada, and the number of sugar mills required for sugarcane crushing also increased
मराठवाड्यामध्ये एकूण 55 साखर कारखान्यांनी 66 लाख टन उसाचे गाळप केले आहे. ऊस गाळप हंगाम सुरू होऊन आता अडीच महिन्यांचा कालावधी झालेला आहे. तर या प्रक्रियेतून 80 लाख क्विंटल साखरेचे उत्पन्न झालेले आहे.
याआधी मराठवाड्यातील उस्मानाबाद परांडा या भागातील उसाचे गाळप हे पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांवर अवलंबून असायचे. तर आता या विभागामध्ये एकूण 55 साखर कारखाने आहेत. यामध्ये सर्वाधिक 12 कारखाने हे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App