सुभेदार’ च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! 40 हजारांहून अधिक प्रेक्षक रिलीजआधीच सुभेदार सिनेमा पहायला उत्सुक!


विशेष प्रतिनिधी

पुणे : दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित सुभेदार हा सिनेमां नरवीर तान्हाजी मालुसरेंच्या पराक्रमावर आधारीत असणार आहे. या सिनेमाची क्रेझ सध्या सर्वत्र बघायला मिळतं आहे. अष्टकमधील हा पाचवा सिनेमा आहे. दिग्पालचे याआधीचे शिवराज अष्टकमधील चारही सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. या चारही सिनेमावर रसिक प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं आहे. Subhedar upcoming movie news

आणि आता उत्सुकता आहे ती सुभेदार या सिनेमाची या सिनेमाचे टीम सर्वत्र सध्या प्रमोशन करत असून , समाज माध्यमातून या प्रमोशनला देखील प्रेक्षकांची पसंती उतरत आहे. यातच सिनेमाच्या टीमने सर्वांना आनंदाची बातमी दिलीय. “प्रदर्शनाआधीच बुक माय शो वर 40K+ इंटरेस्टेड लाईक्स मिळालेला पहिला मराठी चित्रपट ‘सुभेदार’ !” हा पहिला मराठी सिनेमा ठरलाय. अशाप्रकारे ४० हजारांहून अधिक प्रेक्षक रिलीजआधीच सुभेदार सिनेमा पहायला उत्सुक आहेत. Book My Show वर असा रेकॉर्ड करणारा सुभेदार हा पहिलाच मराठी सिनेमा ठरलाय.

नुकतीचं या सिनेमाची संपूर्ण टीम सिंहगडावर गेली. तसे काही फोटोज आणि व्हिडिओ समाज माध्यमातून व्हायरल झाले.

25 ऑगस्ट रोजी सुभेदार आपल्या भेटीला येतं आहे. सध्या या सिनेमाचं प्रमोशन जोरदार सुरू आहे.मरीन ड्राई्व्हवर सुभेदार सिनेमाचं भन्नाट प्रमोशनसुभेदार चित्रपटाची टीम आज रविवारी सकाळी मरीन्स ड्राईव्हवर गेली होती. तिथे सुभेदार सिनेमाच्या टीमला भेटायला असंख्य फॅन्सनी गर्दी केली.यावेळी चिन्मय मांडलेकर, विराजस कुलकर्णी, अभिजीत श्वेतचंद्र अशा सिनेमातील कलाकारांनी तरुणाईसोबत गाण्यांवर तरुणाईने ठेका धरला.

या डान्सचे व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओत चिन्मय मांडलेकर आणि सिनेमाचे इतर कलाकार भन्नाट डान्स करताना दिसत आहेत. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर सुद्धा सर्व टीमसोबत उपस्थित होते.

 Subhedar upcoming movie news

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात