शिवार फाऊंडेशनचे संस्थापक सुभाष साळवे यांनी चित्रपटावर बंदी घालण्यासाठी महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहिलं आहे.Subhash Salve, founder of Shivar Foundation, demands ban on ‘Pushpa’ film
विशेष प्रतिनिधी
मुंबई : अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असलेला ‘पुष्पा’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय.अशातच या चित्रपटाबाबत मोठा वाद निर्माण झाला आहे.दरम्यान शिवार फाऊंडेशनचे संस्थापक सुभाष साळवे यांनी चित्रपटावर बंदी घालण्यासाठी महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहिलं आहे.
‘पुष्पा या चित्रपटात पोलीस वर्दीचा वापर करून जनतेचा पोलीस प्रशासनवरील विश्वास उठेल असं दृश्य दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे पोलीस बांधवांना आणि पोलीस समर्थकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत,’ अशी तक्रार त्यांनी पत्राद्वारे केली आहे.
तसेच सुभाष साळवे यांनी ‘चित्रपट निर्माता व अभिनेता यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात यावं आणि चित्रपटावर बंदी घालण्यात यावी.तसेच असं चित्रीकरण थांबायला पाहिजे यासाठी महाराष्ट्र गृहमंत्र्यांनी पाऊल उचलावं, जेणेकरून कुठलाही अभिनेता व निर्माता पोलीस प्रशासन, खाकीचा अवमान करण्याच हिंमत करणार नाही,’ अशी मागणी सुभाष साळवे यांनी गृहमंत्र्यांकडे केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App