संतोष देशमुख प्रकरणात कठोर कायदेशीर कारवाई, पण त्यावरून कुठलेच राजकारण नको; फडणवीसांची स्पष्ट भूमिका!!

Fadnavis

विशेष प्रतिनिधी

नागपूर : बीड मधल्या संतोष देशमुख प्रकरणाला आता मराठा विरुद्ध ओबीसी असे जातीय वळण लागत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात आपली भूमिका मांडली देशमुख प्रकरणांमध्ये कठोर कायदेशीर कारवाई सुरू आहे. दोषींना कोणत्याही परिस्थितीत सरकार सोडणार नाही, मग तो दोषी कितीही मोठा असो, असे फडणवीसांनी आज नागपूरमध्ये स्पष्ट केले. पण त्याच वेळी या गंभीर प्रकरणांमध्ये कुठल्याही स्वरूपाचे राजकारण कोणीही आणायला नको असा स्पष्ट इशारा फडणवीस यांनी दिला.Strict legal action in Santosh Deshmukh case, but no politics over it; Fadnavis’ clear role!!



बीड मधल्या संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे वाल्मीक कराड त्यांचे राष्ट्रवादीतले जुने संबंध या सगळ्याचा चुथडा झाला आहे. त्यातच वेगवेगळ्या शहरांमध्ये मोर्चामध्ये मनोज जरांगे यांनी एन्ट्री केल्यामुळे त्याला मराठा विरुद्ध ओबीसी स्वरूप प्राप्त करून द्यायला काही संघटना पुढे आल्या आहेत. मनोज जरांगे विरुद्ध लक्ष्मण हाके अशी लढाई यात रंगली असून त्यामध्ये सुरेश धस आणि बाकीचे सर्वपक्षीय आमदार यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.

पण या सगळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र अजूनही नामानिराळे राहिलेत. त्यांनी परदेश दौऱ्यावरून परत आल्यानंतर बारामतीत एक कार्यक्रम घेतला पण संतोष देशमुख प्रकरणावर ते काहीही बोलले नाहीत त्यांनी धनंजय मुंडेंची मूकपणे पाठराखण चालवली आहे.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये सगळ्याच पक्षाच्या नेत्यांना गंभीर इशारा देऊन संतोष देशमुख प्रकरणांमध्ये राजकारण आणू नका, असे स्पष्ट बजावले आहे.

Strict legal action in Santosh Deshmukh case, but no politics over it; Fadnavis’ clear role!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात