ज्या लोकांनी या गैरव्यवहारामध्ये सहभाग घेतला असेल त्या सर्वांवर कठोर कारवाई केली जाईल – शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

विशेष प्रतिनिधी

मुंबई : टीईटी परीक्षेतील गैरव्यवहार समोर आल्यानंतर राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आपले मत व्यक्त केले आहे. त्या म्हणाल्या की, टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणाची बातमी पाहिल्यानंतर विभागातील वरिष्ठ अधिकार्यांशी चर्चा केली आहे. कुणीही मुलांच्या भविष्य सोबत खेळत असेल तर ते अजिबात खपवून घेतले जाणार नाही. कुणाचीही पर्वा केली जाणार नाही. जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कठोर कारवाई मात्र निश्चितच होईल, असे त्यांनी सांगितले आहे.

Strict action will be taken against all those involved in this malpractice of TET exam : Education Minister Varsha Gaikwad

पुढे त्या म्हणतात की, शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णाजी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्यात आलेली आहे. या समितीद्वारे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार आहे. आणि या समितीने केलेल्या चौकशीनंतर अहवाल लवकरात लवकर सादर केला जाईल. आणि योग्य ती कायदेशीर प्रक्रियेद्वारे आवश्यक ते सहकार्य संपूर्ण शालेय शिक्षण विभागाकडून केली जाईल, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.


आता १५ डिसेंबरपासून सुरू होणार पुणे मुंबईच्या शाळा ; वर्षा गायकवाड यांनी दिली माहिती


ज्या लोकांनी या गैरव्यवहारामध्ये सहभाग घेतला असेल त्या सर्वांवर कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा देखील वर्षा गायकवाड यांनी यावेळी दिला आहे.

Strict action will be taken against all those involved in this malpractice of TET exam : Education Minister Varsha Gaikwad

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात