आज बाजार सुरू होताच सेन्सेक्स तब्बल ७२० अंकांनी कोसळला आहे. त्यानंतर सेन्सेक्समधील घसरण सुरूच आहे. Stock market shakes! Sensex fell by 1420 points; Billions of rupees to investors
विशेष प्रतिनिधी
मुंबई : शेअर बाजारातील पडझड कायम असते.गुरुवारचा अपवाद सोडता या आठवड्यात प्रत्येक दिवशी सेन्सेक्समध्ये घसरण झाल्याचे पहायला मिळाले. दरम्यान आज बाजार सुरू होताच सेन्सेक्स तब्बल ७२० अंकांनी कोसळला आहे. त्यानंतर सेन्सेक्समधील घसरण सुरूच आहे.
सध्या सेन्सेक्स १४२० अंकांनी कमी झाला असून ५८ हजार अंकांपेक्षाही कमी पातळीवर व्यवहार सुरू आहेत. गुरुवारी बाजार बंद होताना सेन्सेक्स ५८७९५ च्या पातळीवर पोहोचला होता. मात्र शुक्रवारी पुन्हा एकदा सेन्सेक्स तब्बल १४२० अंकानी घसरला आहे. याचा मोठा फटका गुंतवणुकदारांना बसत आहे.
आज शेअरबाजार सुरू झाला तेव्हा बीएसई लिस्टेड ३० कंपन्याच्या यादीतील डॉक्टर रेड्डीज या कंपनीच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली आहे.दुसरीकडे पाहिलं तर मारूती सुझुकी सारख्या कंपन्यांचे शेअर रेड झोनमध्ये होते. सातत्याने सेन्सेक्समध्ये घसरण सुरूच असून, अद्यापही घसरण थांबलेली नाही. त्यामुळे गुंतवणुकदार संकटात सापडले आहेत.निफ्टीत घसरण दुसरीकडे निफ्टीत देखील मोठी घसरण झाली आहे.
आज शेअर बाजार सुरू होताचा निफ्टी तब्बल २५० अंकांनी घसरली.सध्या निफ्टी १७३३८.५ अंकावर पोहोचली आहे. गुरुवारी सेन्सेक्स काही अंकांनी वाढल्यामुळे निफ्टीमध्ये देखील वाढ पहायला मिळाली होती.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App