माढ्यात अभिजीत पाटलांकडून फडणवीसांची मनधरणी, तरीही विठ्ठल कारखान्याला नोटीस साखर साठा जप्तीची!!

विशेष प्रतिनिधी

सोलापूर : माढ्यात अभिजीत पाटलांकडून फडणवीसांची मनधरणी, तरीही विठ्ठल कारखान्याला नोटीस साखर साठा जप्तीची!! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर देखील राज्य सहकारी बँकेच्या कारवाईत फरक पडलेला नाही. State cooperative bank published notice against vitthal cooperative sugar factory

अभिजीत पाटील चेअरमन असलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखाने 432 कोटींची थकबाकी न भरल्याने बँकेने विठ्ठल कारखान्याचा 1 लाख कोटी साखरेचा साठा जप्त करण्याची नोटीस विविध वर्तमानपत्रांमधून प्रसिद्ध केली आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक ऐन रंगात आली असताना विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे आर्थिक आणि राजकीय नाट्य रंगले आहे.

शरद पवारांची सभा सुरू असताना विठ्ठल कारखान्याच्या गोडाऊन वर राज्य सहकारी बँकेने नोटीस लावली, अशी बातमी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी अभिजीत पाटलांना दिली. अभिजीत पाटलांनी तातडीने सभा सोडून विठ्ठल कारखाना गाठला, पण तोपर्यंत गोडाऊन वरची नोटीस लावण्याची कारवाई पूर्ण झाली होती. त्यानंतर राजकीय अपरिहार्यता म्हणून शरद पवारांशी चर्चा करून अभिजीत पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांच्याकडे मदतीची याचना केली. या भेटीनंतर फडणवीसंनी आपल्यावर भाजप प्रवेशाची अट घातलेली नाही, पण आपल्याला लोकसभा निवडणुकीत भाजपला मदत करण्याची अट घातली आहे, असा दावा अभिजीत पाटलांनी केला. त्या दाव्याला फडणवीस किंवा भाजपच्या कुठल्याही नेत्याने दुजोरा दिला नाही.

25 % रक्कम भरता आली नाही

मूळात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडे 432 कोटी रुपयांची राज्य सहकारी बँकेची थकबाकी आहे. तिच्या 25% रक्कम भरून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला ही जप्ती टाळता आली असती. ते कायदेशीर पाऊल ठरले असते. परंतु अभिजीत पाटील किंवा त्यांचे पॉलिटिकल मेंटॉर शरद पवार 100 कोटींची रक्कम उभी करून ती राज्य सहकारी बँकेत भरायला तयार झाले नाहीत. अर्थातच त्यामुळे राज्य सहकारी बँकेने विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या गोदामातली 1 लाख पोती साखर जप्त करण्याची नोटीस वर्तमानपत्रात प्रसिद्ध केली.

State cooperative bank published notice against vitthal cooperative sugar factory

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात