प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात एसटी कामगारांचा संप सुरू असताना खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांनी अक्षरशः प्रवाशांची लूटमार चालवली आहे. तिप्पट – चौकट भाडे आकारले जात आहे. दिवसाढवळ्या हे प्रकार सुरू असताना राज्य सरकार मात्र त्याला पायबंद घालताना दिसत नाही.ST workers strike; Looting from private travels, but still not stopped by the government
दिवाळीला गावाला गेलेले किंवा गावावरून मुंबईला आलेल्या हजारो प्रवाशांनी आता खासगी ट्रॅव्हल्सची वाट धरली आहे पण त्यांना तिप्पट-चौपट पैसे मोजून घरी परतण्याची परतावे लागत आहे त्यामुळे अक्षरशः मध्यमवर्गीय आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय यांचे बजेट कोलमडले आहे.
राज्यभरात २२० डेपोंमध्ये एसटीच्या गाड्या उभ्या आहेत. सोमवारी सकाळपासून एसटीचा शंभर टक्के संप सुरु झाला आहे. त्याचा गैरफायदा खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांनी लागलीच घेतला आणि काही तासांत खासगी ट्रॅव्हल्सच्या तिकिटांचे दर अव्वाच्या सव्वा वाढवले. त्यामुळे सर्व सामान्यांची गैरसोय केली आहे.
विशेष म्हणजे एकदा खरेदी केलेले तिकीट पुन्हा रद्द करता येणार नाही, अशी दटावणी करूनच ट्रॅव्हल्सवाले तिकिटांचे आरक्षण करू लागले आहेत. त्यामुळे जर एसटीचा संप मिटला तरी प्रवाशांना नाईलाजास्तव ट्रॅव्हल्सनेच प्रवास करावा लागणार आहे, त्यामुळे ट्रॅव्हल्सवाल्यांनी अशी शक्कल लढवली आहे. मुंबईहून सातारा, कोल्हापूर, जळगाव या भागात जाणाऱ्या ट्रॅव्हल्सवाल्यांनी तिकीट दर भरमसाठ वाढवले आहेत.
संप चालेले तसे दर वाढणार
प्रवाशांना खासगी ट्रॅव्हल्सवाले थेट सांगत आहेत की, आजचे दर आणि उद्याचे दर वेगळे असू शकतात, सध्या एसटीचा संप सुरु आहे, त्यामुळे ट्रॅव्हल्स कंपन्या तिकिटांचे दर वाढवत आहेत. उद्याही संप सुरु राहिला तर तिकीट दर आणखी वाढलेले असतील, असे ट्रॅव्हल्सच्या गाड्यांच्या तिकिटांचे आरक्षण करणारे एजंट सांगत आहेत. राज्य सरकार मात्र या भरमसाठ भाडेवाढीवर कोणताही उपाय करताना दिसत नाही.
असे आहेत दर
आताचे दर आणि कंसात पूर्वीचे दर
बोरिवली ते महाबळेश्वर एसी सीटिंग ७०० (५००)
बोरिवली ते महाबळेश्वर एसी स्लीपर १५०० (११००)
बोरिवली ते जळगाव एसी सीटिंग १३०० (९००)
बोरिवली ते जळगाव एसी स्लीपर २००० (१५००)
बोरिवली ते कोल्हापूर एसी सीटिंग ९०० (६००)
बोरिवली ते कोल्हापूर एसी स्लीपर १७०० (१३००)
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App