वृत्तसंस्था
मुंबई : राज्यात रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा, यासाठी एसटी महामंडळाने पुढाकार घेतला आहे. त्या अंतर्गत एसटीचे चालक परराज्यातून महाराष्ट्रात ऑक्सिजनचे टँकर आणणार आहेत.ST Corporation for oxygen supply Tanker to bring driver from foreign countries
याबाबत माहिती देताना परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले, आगामी काळात रस्ते वाहतूक करणाऱ्यांसाठी SOP आणणार आहे.राज्यात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा आहे. इतर राज्यांमधून हा ऑक्सिजन आणण्याची परवानगी केंद्र सरकारनं दिली.
त्यामुळं आता तशी तयारी केली जात आहे. पण ऐनवेळी ऑक्सिजनचे टँकर आणण्यासाठी ड्रायव्हर मिळत नसल्याचं संकट समोर उभं राहिलं. अशा वेळी एसटीच्या चालकांच्या मदतीनं हे टँकर आणले जाणार आल्याचं परब यांनी सांगितलं.
ऑक्सिजन टँकरना ग्रीन कॉरिडोर
विशेष म्हणजे तातडीनं गरज असेल त्याठिकाणी ऑक्सिजन पोचवण्यासाठी टँकरला ग्रीन कॉरिडोर तयार करून दिला जाईल, अअशी माहितीही परब यांनी दिली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App