शिवसेनेच्या राजवटीत एसटी महामंडळाची वाट लागली, काँग्रेस नेत्याचा ठाकरे सरकारला घरचा आहेर

  • थकित वेतन दिले नाही तर एसटी कर्मचारी दिवाळी सणाच्या तोंडावर संपावर जाण्याचा इशारा

विशेष प्रतिनिधी

नाशिक : एसटी महामंडळात शिवसेनेच्या राजवटीच्या काळात खासगी कंत्राटदार आणल्याने महामंडळाची पार वाट लागली, अशा शब्दांत काँग्रेस नेते जयप्रकाश छाजेड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांना घरचा आहेर दिला. state transport employees

दिवाळीच्या तोंडावर राज्य सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अनेक महिन्यांचे वेतन रखडल्याने एसटी कर्मचारी आता आक्रमक झाले आहेत. थकीत वेतन तात्काळ दिले नाहीत तर एसटी कर्मचारी संपाचे हत्यार उपसणार असल्याचा इशारा इंटकचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी दिला आहे. state transport employees

शिवसेनेच्या काळात खासगी कंत्राटदार आणल्याने एसटी महामंडळाची वाट लागली, असा गंभीर आरोपही छाजेड यांनी करत ठाकरे – पवार सरकारला घरचा आहेर दिला आहे.

अन्यथा महामंडळावर फौजदारी गुन्हा

एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन दिवाळी आधी दिले नाहीत तर आम्ही महामंडळावर फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा देखील छाजेड यांनी दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जयप्रकाश छाजेड म्हणाले की, कोरोनाच्या काळात एसटी सेवा बंद होती. त्यामुळे एसटी महामंडळाचं आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडलं. गेल्या तीन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांना वेतनच मिळाले नाही. कोरोना काळात काम करुनही एसटी कर्मचाऱ्यांना पगार नाही.

ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे वेतन कर्मचाऱ्यांना मिळालेले नाही. त्यामुळे संसाराचा गाडा रेटायचा तरी कसा? हा प्रश्न कर्मचाऱ्यांसमोर उभा राहिला आहे. त्यात दिवाळी सण तोंडावर आला आहे, सण साजरा करायचा तरी कसा, असा प्रश्न कर्मचाऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.

state transport employees

एसटी कर्मचारी संघटनांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेही विनवणी केली होती. परंतु, अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतला गेलेला नाही. त्यामुळे आता कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या आहेत. कर्मचाऱ्यांचे पगार द्या, 1936 च्या कायद्यान्वये महामंडळावर फौजदारी गुन्हा दाखल करु, अशी भूमिका इंटकने घेतली आहे.

‘एसटी बचाव-कामगार बचाव’

ST employes warns thackeray – pawar govt to go strike

मार्च ते ऑगस्ट या कालावधीत एसटी महामंडळाचे सुमारे 3366 कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. त्यामुळे एसटीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर इंटककडून राज्यव्यापी अभियान राबवले. या अंतर्गत राज्यातील सर्व आमदार आणि खासदार यांना निवेदन देऊन, ‘एसटी बचाव-कामगार बचाव’ असे साकडे घातले होते.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*