येरवडा कारागृहात सुरू होणाऱ्या कैद्यांसाठी क्रीडा प्रशिक्षण

येरवडा कारागृहातून खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने तज्ज्ञ प्रशिक्षकांची नेमणूक केली आहे. येरवडा कारागृह येथे बंदयांसाठी ‍क्रीडा प्रशिक्षण लवकरच सुरू करणार असल्याची माहिती अपर पोलीस महासंचालक व कारागृह व सुधारसेवा महानिरीक्षक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी दिली. Sports training for prisoners starting at Yerawada Jail


विशेष प्रतिनिधी

पुणे: येरवडा कारागृहातून खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने तज्ज्ञ प्रशिक्षकांची नेमणूक केली आहे. येरवडा कारागृह येथे बंदयांसाठी ‍क्रीडा प्रशिक्षण लवकरच सुरू करणार असल्याची माहिती कारागृह व सुधारसेवा महानिरीक्षक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी दिली.

येरवडा कारागृह येथे महात्मा गांधी जयंतीनिमित्त महाराष्ट्र कारागृह विभाग व इंडियन ऑइल कॉर्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘परिवर्तन-प्रिझन टू प्राईड’ या उपक्रमाचे उदघाटन कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

कॅरम, व्हॉलीबॉल व बुद्धिबळ यासाठी बंदयांचे प्रशिक्षण लवकरच सुरू करण्यात येणार असून येरवडा कारागृहामधून 60 बंदयांनी या खेळासाठी संमती दर्शवली आहे. महिला बंदयाच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि खेळासाठी संधी देण्यात येणार आहे अशी माहिती कुलकर्णी यांनी दिली.

Sports training for prisoners starting at Yerawada Jail

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात