• Download App
    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी खास फेटा; रविवारच्या पुणे दौऱ्यानिमित्त मोठी तयारी । Special feta for Prime Minister Narendra Modi; Great preparations for Sunday's Pune tour

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी खास फेटा; रविवारच्या पुणे दौऱ्यानिमित्त मोठी तयारी

    वृत्तसंस्था

    पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी (ता. ६ ) पुणे दौर्‍यावर येत आहेत. त्यानिमित्त त्यांच्यासाठी खास फेटा तयार करण्यात आला आहे. पंतप्रधान पंडित नेहरू यांच्यानंतर म्हणजे जवळपास ५० वर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे महापालिकेला भेट देणारे दुसरे पंतप्रधान ठरणार आहे. त्यांच्या हस्ते पुणे महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण यांच्यासह विविध प्रकल्पाचे उदघाटन आणि भूमिपूजन केले जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मुरुडकर झेंडेवाले यांना आकर्षक असा फेटा तयार करण्यास सांगितला. त्यानंतर गिरीश मुरुडकर यांनी तब्बल ८ दिवस मेहनत घेऊन ‘शाही फेटा’ तयार केला आहे. Special feta for Prime Minister Narendra Modi; Great preparations for Sunday’s Pune tour



    या बाबत अधिक माहिती देत गिरीश मुरुडकर म्हणाले की, आम्ही फेट्याचे २५ पॅटर्न पाहिले. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या कपडयांना करत मॅच होणारा फेटा बनवण्याचं ठरवलं. क्रीम विथ रेड कापडचा वापर केला आहे. यासाठी पैठणीचे कापड, जरी आणि ऑस्ट्रेलियन डायमंड असे साहित्य वापरले आहेत. फेट्याच्या वरील बाजूस गोल्ड प्लेट लावली असून त्याला सोन्याचं पाणी दिलंय. तर, त्याच्या मध्यभागात मोत्याच्या सूर्यफुलामध्ये शिवमुद्रा बसविली आहे. सूर्यफुलाचं वैशिष्टय असं की, ते नेहमी तेजाकडे, सूर्याकडे पाहत असते,” अशीच थीम घेऊन फेटा तयार केला.

    Special feta for Prime Minister Narendra Modi; Great preparations for Sunday’s Pune tour

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्रे, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी ₹993 कोटींच्या कामांना मान्यता

    राष्ट्रवादी वाले रणनीती बदलतील, रणनीतीकार बदलतील; पण “विश्वास” नावाचा शब्द कुठून आणतील?? आणि भाजप आणि शिंदे काय शेंगांची टरफलं सोलत बसतील काय??

    Palghar Highway Accident : ट्रक – कंटेनरच्या टक्करमध्ये 13 ठार; पालघर जिल्ह्यात साखरपुड्याला जाणाऱ्या वऱ्हाड्यांचा मृत्यू; 25 गंभीर, मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील घटना