अमेरिका – इराण युद्धविरामात पाकिस्तानची मध्यस्थी फक्त नावापुरती; खरी स्क्रिप्ट अमेरिकेचीच!!
मेरिका आणि इराणमध्ये दोन आठवड्यांचा ऐतिहासिक युद्धविराम (Ceasefire) जाहीर झाला असला तरी यातली पाकिस्तानची मध्यस्थी फक्त नावापुरतीच, खरी स्क्रिप्ट अमेरिकेचीच!!, हेच राजकीय वास्तव पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ एका मोठ्या डिजिटल चुकीमुळे समोर आले. त्यामुळे ते ट्रोल झाले. युद्धविरामाच्या घोषणेपूर्वी शरीफ यांनी ‘X’ (ट्विटर) वर एक पोस्ट केली होती, ज्याच्या सुरुवातीला चुकून मजकुराचे स्वरूप दर्शवणारा ‘Draft’ हा शब्द राहिल्याने त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार सुरू झाला.