राज ठाकरेंकडून अशोक सराफ यांचे विशेष अभिनंदन, म्हणाले…

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना 2023 चा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे


विशेष प्रतिनिधी

मुंबई : आपल्या अष्टपैलू अभिनयाच्या जोरावर अवघ्या सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना 2023 चा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी यासंबंधीची घोषणा केली. त्यांनी स्वतः अशोक सराफ यांना फोन करून त्यांचे अभिनंदन केले. यानंतर सर्वच स्तरातून अशोक सराफ यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही अशोक सराफ यांचे विशेष पोस्टद्वार अभिनंदन केले आहे.Special congratulations to Ashok Saraf from Raj Thackeray



राज ठाकरे म्हणाले, ‘अशोक सराफ यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला, त्याबद्दल अशोक सरांचे मनापासून अभिनंदन. मी मागे एकदा म्हणालो तसं, एकाच वेळेला सिनेमा, रंगभूमी आणि टीव्ही ह्या तिन्ही माध्यमांवर हुकूमत गाजवणारे चतुरस्त्र कलाकार ह्या देशाने खूप कमी पाहिले, अशोक सर त्यातले एक.’

तसेच ‘मराठीत कलाकारांचा अजिबात तुटवडा नाही, पण आपल्या भाषेच्या सीमा ओलांडून एखादा नट देशव्यापी ओळखला जातोय किंवा त्यासाठी प्रयत्न करतोय असं दिसत नाही. पण अशोक सर ह्या बाबतीत देखील अपवाद ठरले. असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.’

याशिवाय ‘महाराष्ट्र भूषण सारखे राज्यातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कलाकरांना ते उमेदीत असताना मिळावेत असं मला वाटतं. अर्थात हे प्रत्येक वेळेला होतंच असं नाही पण अशोक सरांच्या बाबतीत राज्य सरकारने योग्य टप्प्यावर त्यांचा उचित सन्मान केला ह्याबद्दल राज्य सरकारचं पण मनापासून अभिनंदन. पुन्हा एकदा अशोक सराफ सरांचे मनःपूर्वक अभिनंदन!’ अशा शब्दांमध्ये राज ठाकरे यांनी अशोक सराफांचे अभिनंदन केलं आहे

Special congratulations to Ashok Saraf from Raj Thackeray

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात