समाजकार्याचा वसा चालवणारा एक अतिशय प्रभावी लोकप्रतिनिधी गमावला, असंही मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवेसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं निधन झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आणि जवळचे म्हणून अनिल बाबर यांची ओळख होती. सांगलीच्या खानापूर विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार होते. त्यांच्या निधानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत, शोकभावना व्यक्त केली.Chief Minister Shindes emotional post after the death of MLA Anil Babar
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने आपण खऱ्या अर्थाने शिवसेनेचा समाजकार्याचा वसा चालवणारा एक अतिशय प्रभावी असा लोकप्रतिनिधी गमावला आहे. त्यांच्यावर शासकीय ईतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्या आहेत.
आपल्या खानापूर आटपाडी मतदारसंघांमध्ये त्यांनी शिवसेनेचे केलेले कार्य कधीही न विसरण्याजोगे आहे. बेघरांना घरे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे किंवा रक्तदान शिबिरांचे आयोजन, कृष्णा खोऱ्यातील पाणी आणि टेंभू योजना कार्यान्वित व्हावी म्हणून केलेले प्रयत्न असो किंवा शिक्षण संस्थांच्या माध्यमातून शिक्षणाचा तळागाळापर्यंत केलेला प्रसार असो, अनिल बाबर यांनी एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून काम केले. खानापूर आटपाडी भागामध्ये शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी अनिल बाबर हे कायम एका लढाऊ वृत्तीने लढले. त्यांनी या भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अथक प्रयत्न केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत सदाशिव पाटील यांचा अनिल बाबर यांनी २०१९च्या निवडणुकीत पराभव केला होता. काँग्रेस-राष्ट्रवादीत, काँग्रेस-शिवसेना असा त्यांचा राजकीय प्रवास होता. सलग चारेवळा ते आमदार म्हणून निवडून ले होते. मागील काही दिवसांपूर्वी त्यांना न्यूमोनिया झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.
त्यांच्या निधनाने शिवसेनेचा एक ज्येष्ठ लोकप्रतिनिधी, माझा जवळचा सहकारी आणि मार्गदर्शक आम्ही गमावला आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो तसेच बाबर कुटुंबातील सदस्यांना या दुःखातून सावरण्याकरता बळ देवो हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App