न केलेल्या कामाचे श्रेय घेणे अभिनेता सोनू सूदला महागात, ओडिशातील जिल्हाधिकाऱ्यांनी खुलासा करताच नेटकऱ्यांनी घेतले फैलावर

Sonu Sood claims arranging bed in Odisha hospital; district magistrate counters stating no bed issues

Sonu Sood  : बॉलिवूड अभिनेता सोनू सूदला कोरोना महामारीच्या काळातील त्याच्या उदात्त मदतीमुळे ‘मसिहा’ म्हणून ओळखले जात आहे. समाजातील कानाकोपऱ्यातून त्याचे कौतुक होत आहे. परंतु, अभिनेता सोनू सूदला आता नेटकऱ्यांच्या टीकेचे धनीही व्हावे लागले आहे. सोनू सूदने ओडिशातील एका हॉस्पिटलमध्ये बेड अरेंज करत असल्याचे ट्वीट केले होते, परंतु तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: यावर खुलासा करून बेडची कोणतीही अडचण नसल्याचे स्पष्ट केले. यानंतर सोनूचे कौतुक करणारे चाहतेच आता खोट्या कामाचे श्रेय घेतल्याने त्याच्यावर खटला चालवण्याची मागणी करू लागले आहेत. Sonu Sood claims arranging bed in Odisha hospital; district magistrate counters stating no bed issues


विशेष प्रतिनिधी

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सोनू सूदला कोरोना महामारीच्या काळातील त्याच्या उदात्त मदतीमुळे ‘मसिहा’ म्हणून ओळखले जात आहे. समाजातील कानाकोपऱ्यातून त्याचे कौतुक होत आहे. परंतु, अभिनेता सोनू सूदला आता नेटकऱ्यांच्या टीकेचे धनीही व्हावे लागले आहे. सोनू सूदने ओडिशातील एका हॉस्पिटलमध्ये बेड अरेंज करत असल्याचे ट्वीट केले होते, परंतु तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: यावर खुलासा करून बेडची कोणतीही अडचण नसल्याचे स्पष्ट केले. यानंतर सोनूचे कौतुक करणारे चाहतेच आता खोट्या कामाचे श्रेय घेतल्याने त्याच्यावर खटला चालवण्याची मागणी करू लागले आहेत.

काय आहे प्रकरण?

ओडिशाच्या गंजम जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली असून यात सोनू सूदच्या ट्वीटचा स्क्रीनशॉट समाविष्ट आहे. त्या ट्वीटमध्ये सोनू म्हणतो की, “चिंता करू नका, ब्रह्मपूरच्या गंजम शहर रुग्णालयात (डीसीएचसी) बेड्सची व्यवस्था केली आहे.” जिल्हाधिकारी कार्यालयाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून त्याला उत्तर दिले की, “सोनू सूद फाउंडेशन किंवा अभिनेता सोनू सूद यांच्याकडून आमच्याशी कोणताही संपर्क झालेला नाही. सीएमओ ओडिशाकडून लिहिलेल्या संदेशात रुग्ण आयसोलेशनमध्ये असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे कळते. बेड्सची कोणतीही अडचण नाही. ब्रह्मपूर महानगरपालिका त्यांची काळजी घेत आहे.”

https://twitter.com/Ganjam_Admin/status/1394202241125425153?s=20

नेटकऱ्यांची सोनूवर खटला चालवण्याची मागणी

ही पोस्ट सोशल मीडियावर येताच नेटकऱ्यांनी एकामागोमाग एक प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. ओडिशााच्या प्रशासनाने सोनू सूदविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी काही युजर्सची मागणी आहे. अशा कठीण काळातही तो खळबळ माजवत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्याचवेळी दुसर्‍या एका युजरने स्क्रीनशॉटद्वारे म्हटले की, सोनू सूदची मदत घेणारी लोकं आता आपल्या पोस्ट डिलीट करत आहेत.

सोनू सूदकडूनही प्रत्युत्तर

अभिनेता सोनू सूदने नुकतेच एका मनोरंजन पोर्टलशी झालेल्या संभाषणात म्हटले होते की, ‘असे लोक आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात नेहमीच असतील. या संकटाच्या वेळी आपल्या सर्वांनी जे करण्याची गरज आहे, ते करताना मला ती लोकं दिसत नाहीत. अजेंड्याशिवाय ते हे कसे करू शकतात? जर त्यांचा कोणताही छुपा अजेंडा नसेल तर चला आपण एकत्र येऊ. सोनू सूद म्हणाला, “मी या गोष्टींवर माझा वेळ वाया घालवत नाही.” जे लोक मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यावर मी लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली, तर मी जीव वाचविण्यासाठी वापरत असलेला बहुमोल वेळ वाया घालवीन. तसेच मला त्यांच्याकडे लक्ष द्यायचे नाही, कारण त्यांनाही तेच हवे आहे.’

Sonu Sood claims arranging bed in Odisha hospital; district magistrate counters stating no bed issues

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात