दिल्लीमध्ये जैशच्या दहशतवाद्याला अटक, साधूच्या वेशात स्वामी नरसिंहानंदांच्या हत्येचा होता कट

jaish E Mohammad Terrorist Dar Arrested From Delhi Who Was Planning To Kill Swami Narsinhanand

jaish E Mohammad Terrorist : वादग्रस्त पुजारी स्वामी यति नरसिंहानंद यांची हत्या करण्याचा कट रचणाऱ्या जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याला दिल्लीत अटक करण्यात आली आहे. जान मोहम्मद डार असे या दहशतवाद्याचे नाव आहे. तो काश्मीरमधील पुलवामाचा असून दिल्लीच्या पहाडगंजमधील हॉटेलमध्ये थांबला होता. jaish E Mohammad Terrorist Dar Arrested From Delhi Who Was Planning To Kill Swami Narsinhanand


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : वादग्रस्त पुजारी स्वामी यति नरसिंहानंद यांची हत्या करण्याचा कट रचणाऱ्या जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याला दिल्लीत अटक करण्यात आली आहे. जान मोहम्मद डार असे या दहशतवाद्याचे नाव आहे. तो काश्मीरमधील पुलवामाचा असून दिल्लीच्या पहाडगंजमधील हॉटेलमध्ये थांबला होता.

दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, जानन मोहम्मदकडून मिळालेल्या माहितीवरून असे दिसून आले आहे की तो हिंदू धर्मगुरूचा वेश घेऊन जाणार होता आणि दासना येथील देवी मंदिरातील स्वामी यति नरसिंहानंद सरस्वती यांना ठार करणार होता. नरसिंहानंद यांनी नुकतेच इस्लाम धर्माबद्दल आक्षेपार्ह भाष्य केले होते.

दिल्ली पोलिसांनी या दहशतवाद्याकडून केशरी कुर्ता, पांढरा पायजामा, कलावा, मणी, चंदन व कुमकुम असे साहित्य जप्त केले आहेत. दारच्या ताब्यातून पाइंट 30 बोअरची पिस्तूल आणि दोन मॅगझिन जप्त करण्यात आले असून त्यात 15 जिवंत काडतुसे आहेत. प्राथमिक चौकशीत जान मोहम्मद डारने म्हटले की, त्याला दहशतवादी संघटनेने पुजारीची हत्या करण्यास सांगितले होते.

‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, असे सांगितले जात आहे की जान मोहम्मद डार हा सुतार होता, तो जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आबिदच्या संपर्कात डिसेंबर 2020 मध्ये आला होता. पीओकेमध्ये राहून दहशतवादी कारवाया चालविणार्‍या आबिदने दारला दहशतवादी संघटनेत सामील होण्यास प्रेरित केले. असे सांगितले जाते की, 2 एप्रिल 2021 रोजी आबिदने अनंतनागमध्ये दारची भेट घेतली आणि त्याला स्वामी यति नरसिंहानंद सरस्वती यांना ठार मारण्याचे लक्ष्य दिले.

jaish E Mohammad Terrorist Dar Arrested From Delhi Who Was Planning To Kill Swami Narsinhanand

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था