विशेष प्रतिनिधि
पुणे : मराठी कलाविश्वाची ‘अप्सरा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने दिवाळीच्या मुहूर्तावर तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. सोनालीने दुबईत आलिशान नवीन घर खरेदी केलं आहे. अभिनेत्रीचा नवरा कुणाल बेनोडेकर दुबईला असतो त्यामुळे दोघांनी मिळून परदेशात सुंदर घर घेतलं आहे. सध्या सोनालीच्या नव्या घराचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. Sonali Kulkarni new home
दिवाळीच्या मुहूर्तावर शेअर केलेल्या फोटोंना “पाडवा in the new होम” असं कॅप्शन देत अभिनेत्रीने तिच्या नव्या घराची गुडन्यूज चाहत्यांबरोबर शेअर केली. गेल्या अनेक महिन्यांपासून अभिनेत्री शूटिंगच्या व्यग्र वेळापत्रकामुळे मुंबईत होती. परंतु, गृहप्रवेशाच्या निमित्ताने तिने यंदाची दिवाळी नवऱ्याबरोबर दुबईत साजरी केली आहे.
View this post on Instagram A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)
A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)
सोनालीच्या नवीन घरातील सुंदर व्ह्यू आणि दारावरच्या हटके नेमप्लेटने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सोनाली व कुणालच्या नवीन घराच्या नेमप्लेटवर दोघांची टोपणनावं लिहिण्यात आली आहेत. अभिनेत्रीला सगळेजण प्रेमाने सोना, तर तिचा नवरा कुणाल बेनोडेकरला सगळे प्रेमाने केनो म्हणतात. यानुसार या दोघांनी नव्या घरातील नेमप्लेटवर #केनोसोना (#KenoSona) असं लिहून घेतलं आहे.
दारावरच्या या नेमप्लेटजवळ सोनालीने नवऱ्याबरोबर सुंदर फोटोशूट केलं आहे. सध्या अभिनेत्रीवर मराठी कलाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. दरम्यान, सोनालीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर लवकरच ती ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या ऐतिहासिक चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App