विशेष प्रतिनिधी
अलिबाग : अलिबाग तालुक्यातील वरसोली येथील समुद्रकिनारी धक्कादायक घटना घडली. पॅरासेलिंग करताना भरसमुद्रातच दोर तुटला आणि मुंबईतील दोन महिला पर्यटक थेट समुद्रात पडल्या. यामुळे समुद्रकिनारी जाणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. Social Viral: Dad! The rope broke while parasailing ….; Shocking video in front …
पॅरासेलिंग करताना दोरी तुटून महिला समूद्रात पडल्याचा एक व्हीडिओ सध्या व्हायरल होतो. (त्याची सत्य-असत्यता तपासण्यात आलेली नाही.) 3.7 दशलक्षाहून अधिक वेळा हा व्हिडीओ पाहिला गेलेला आहे.
अलिबागमध्ये पॅरासेलिंग करताना पॅराशूटची दोरी तुटल्यानने दोन महिला पाण्यात पडताना दिसते. अलिबाग तालुक्यातील वरसोली येथील समुद्रकिनारी धक्कादायक घटना घडली.
व्हायरल होत असलेल्या या क्लिपमध्ये दोन महिला पॅरासेलिंग राईडची तयारी करत असल्याचे दिसते. बोटीतून बाहेर येईपर्यंत सर्व काही सुरळीत दिसतं. नंतर राईड सुरु झाल्यावर या दोन महिला समूद्रात पडल्याचे दिसते. आणि त्यामुळे बघणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरतं.
या दोन्ही महिला मुंबईतील साकी नाका येथील रहिवासी असून कौटुंबिक सहलीसाठी अलिबागला आल्या असल्याची माहिती समोर आली आहे. लाइफ जॅकेट असल्याने त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. त्या समुद्रात पडल्यानंतर ऑपरेटरने त्यांना तात्काळ बाहेर काढलं. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्या ठीक असल्याचेही दिसते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App