तृप्ती देसाई या बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून गेल्या होत्या.त्यानंतर परत आल्यावर त्यांनी अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहिल्या.Social activist Tripti Desai shared the information about the corona infection on Facebook
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. मागील काही दिवसांपासून अनेक अभिनेते-अभिनेत्री तसेच मोठमोठ्या राजकीय नेत्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या आणि बिग बॉसच्या स्पर्धक असलेल्या तृप्ती देसाई यांना कोरोनाची लागण झाली आहे.
कोरोनाची लागण झाल्याची माहिती ही त्यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत दिली आहे.अखेर कोरोनाने मला गाठलचं- माझी टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे, असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.कतृप्ती देसाई या बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून गेल्या होत्या.त्यानंतर परत आल्यावर त्यांनी अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहिल्या. दरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली.
यावेळी तृप्ती देसाई म्हणाल्या की , ” चाहत्यांनी भेटण्यासाठी गर्दी करत होते.पण मी कोरोना नियम पाळूनच त्यांना भेटले.ज्यावेळी मला त्रास जाणवू लागला त्यानंतर मात्र मी कोणालाच भेटले नाही.माझी प्रकृती चांगली असून सर्वानी काळजी घ्या, कोरोनाचे नियम पाळा ” असे आवाहनही त्यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App