महादेव जानकर यांना कोरोनाची लागण , ट्वीट करत दिली माहिती


पुढील काही दिवस डॉक्टरांच्या सल्ल्याने महादेव जानकर आयसोलेशनमध्ये राहणार आहेत.Mahadev Jankar was informed about the infection of corona by tweeting


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्या वाढतच चालली आहे.दरम्यान गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात राजकीय नेत्यांना तसेच अभिनेत्यांना करोनाची लागण होत आहे. दरम्यान आता राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना करोनाची लागण झाली आहे.महादेव जानकर यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.ट्विटमध्ये महादेव जानकर म्हणाले की , “प्रचंड प्रवास व विविध कार्यक्रम यामुळे कोरोनाची लक्षणे जाणवू लागली होती. त्यामुळे मी करोना टेस्ट केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तसेच पुढील काही दिवस डॉक्टरांच्या सल्ल्याने आयसोलेशनमध्ये राहणार आहे, याची सर्व कार्यकर्त्यांनी नोंद घ्यावी. त्याचप्रमाणे संपर्कात आलेल्यांनी स्वतःची तत्काळ टेस्ट करावी व काळजी घ्यावी, असे आवाहन महादेव जानकर यांनी केले आहे.

Mahadev Jankar was informed about the infection of corona by tweeting

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती