विशेष प्रतिनिधी
मुंबई : महायुती आणि महाविकास आघाडीचे त्रांगडे; छोट्यानाही पडू लागली खुर्चीवर बसायची स्वप्ने!!, अशी अवस्था आता महाराष्ट्राच्या राजकारणात आली आहे.
महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन आघाड्यांमधून 6 मोठे पक्ष आमने-सामने आले असताना छोटे पक्षही निवडणुकीच्या मैदानात काही अपेक्षेने उतरले आहेत. यामध्ये मनसे, परिवर्तन महाशक्ती या नावाने तिसरी आघाडी आणि हैदराबादच्या ओवैसीनचा एआयएमआयएम पक्ष सामील आहेत. या छोट्या पक्षांनी आपापल्या राजकीय वकुबानुसार उमेदवार उभे केले आहेत. त्यातल्या त्यात मनसेने 100 पेक्षा जास्त उमेदवार उभे करून राजकीय पुनरुज्जीवनाचा प्रयत्न चालविला आहे. त्यासाठी राज ठाकरेंनी पहिल्या सभेपासून आपले आमदार निवडून येणार आणि ते सत्तेत बसणार असा धोशा लावला आहे.
Sanju Samson : संजू सॅमसनने डर्बनमध्ये शतक झळकावून इतिहास रचला
पण सत्तेवर बसण्याची स्वप्ने पाहणारे राज ठाकरे एकटेच नाहीत. त्यांच्या पाठोपाठ एआयएमआयएमच्या इम्तियाज जलील यांना देखील सत्तेची स्वप्ने पडू लागली आहेत. वास्तविक एआयएमआयएमने फक्त 14 उमेदवार उभे केले आहेत. त्यातले 4 दलित आहेत पण महायुती आणि महाविकास आघाडी यापैकी कोणालाही बहुमत मिळणारच नाही आणि बहुमतासाठी आपल्या 5 – 10 आमदारांसाठी त्यांना त्यांच्यापैकी कोणालाही आपल्या दारात यावे लागेल, असे राज ठाकरे आणि इम्तियाज जलील यांना वाटत आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे आपल्या आमदारांचा पाठिंबा मागायला घरी येतील, असा दावा इम्तियाज जलील यांनी केला.
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांचेही मत यापेक्षा फारसे वेगळे नाही, कारण त्यामध्ये संभाजीराजे छत्रपती, बच्चू कडू, राजू शेट्टी हे महाविकास आघाडीकडे कल असलेले नेते आहेत. त्यांनी एकत्र येऊन 30-40 उमेदवार उभे केले आहेत. त्यांनाही आपल्या 2 – 5 आमदारांच्या बळावर सत्तेची स्वप्ने पडू लागली आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App