कोळसा घोटाळ्यात काँग्रेसचे माजी खासदार विजय दर्डा, देवेंद्र दर्डा यांच्यासह सहा जण दोषी; 18 जुलैला सुनावणार सजा


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : छत्तीसगढ कोळसा खाण वाटप प्रकरणी काँग्रेसचे माजी खासदार विजय दर्डा आणि त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा यांच्यासह सहा जणांना दोषी ठरविण्यात आले आहे. दिल्ली राऊज एव्हेन्यू कोर्टाने हा निकाल दिला आहे. १८ जूलैला त्यांना शिक्षा सुनावली जाणार आहे. फौजदारी कायदा कलम 120B, 420 खाली त्यांना दोषी ठरवण्यात आले आहेत. विशेष न्यायाधीश संजय बन्सल यांनी विजय दर्डा आणि एका कंपनीसह सहा आरोपींना दोषी ठरवले आहे. Six people including former Congress MP Vijay Darda, Devendra Darda are guilty in the coal scam

काँग्रेसचे माजी खासदार विजय दर्डा यांच्यासह इतरांवरील आरोप निश्चित करताना न्यायालयाने त्याच्या शिक्षेवर युक्तिवाद करण्यासाठी १८ जुलै ही तारीख निश्चित केली आहे. न्यायालयाने IPC च्या कलम 120B 420 आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या इतर कलमांखाली दोषी ठरविले.

कोर्टाने दोषी ठरवलेल्यांमध्ये माजी राज्यसभा खासदार विजय दर्डा आणि त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा, माजी कोळसा सचिव एचसी गुप्ता, दोन वरिष्ठ नागरी सेवक केएस क्रोफा आणि के. सी. सामरिया, जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड आणि तिचे संचालक मनोज कुमार जयस्वाल यांचा समावेश आहे.

Six people including former Congress MP Vijay Darda, Devendra Darda are guilty in the coal scam

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात