विशेष प्रतिनिधी
मुंबई : सर्वांना “बाळा” म्हणून प्रेमाने हाक मारणाऱ्या सिंधुताईं सपकाळ यांना माझं नाव मात्र तोंडपाठ होत, अशी प्रतिक्रिया अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांनी दिली. Sindhutai Sapkal called me by my name : Tejaswini Pandit
सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाने वृत्त कानी पडताच मला मोठा धक्का बसल्याचे सांगताना तेजस्विनी पंडित म्हणाल्या की, ‘मी सिंधुताई सपकाळ’ या चित्रपटात माईंची भूमिका केली होती. त्यानिमित्ताने मला त्यांना जवळून पाहण्याचा योग आला. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर माई काय म्हणतात, याकडे माझे लक्ष लागले होते. त्यांना माझी भूमिका अत्यंत आवडली. त्या म्हणाल्या, तेजस्विनी “…पण तू मला जिवंत केलंस!”
SINDHUTAI SAPKAL:अनाथांची आई सर्वांची लाडकी माई ! पद्मश्री पुरस्कारप्राप्त सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक;वाहिली श्रद्धांजली …
सिंधुताईंच्या निधनानंतर तेजस्विनी पंडितनेही एक पोस्ट लिहून भावना व्यक्त केल्या. माईंच्या आत्म्यास शांती लाभो, अशा शब्दात सिंधुताईंना श्रद्धांजली वाहिली आहे. “अनेक लोकांनी विचारलं तू अजून कसं काही लिहिलं नाहीस. पोस्ट नाही केलं? पटकन जज करतो ना आपण त्यांच्या सोशल मीडियावरुन माणसाला? पण कुटुंबातल्या माणसांना घरातलं कुणी गेल्यावर सोशल मीडियावर पोस्ट करण्याची मनःस्थिति आणि वेळ खरंच असतो?!
माझीही काहीशी अशीच अवस्था झाली. रात्री ममता ताईच्या फोनवरुन बातमी कन्फर्म झाल्यावर काही क्षण पायातली ताकदच गेली. थक्क झाले होते. खूप वेळ फोन वाजत होता. प्रतिक्रियेसाठी.काही जड छातीने उचलले, काही नाही उचलता आले….कारण ती वेळ खरंच नाजूक होती. माई आणि मी रोज संपर्कात होतो का तर नाही….पण तुमच्या आयुष्यात एखादी अशी व्यक्ती येऊन जाते, की तुमचं आयुष्यच बदलून जातं आणि ह्यात त्यांचा हातभार आहे ह्याचं त्यांना भान ही नसतं. चित्रपटानंतर काही वेळा त्यांना भेटण्याचा योग आला….
कधीच कुणाला नावाने हाक न मारता “बाळा” म्हणणार्या माईंना माझं नाव मात्र पाठ होतं. हातात हात घेऊन माझी पाठ थोपटायच्या. मला चित्रपट बघून कायम म्हणायच्या “मी हे आयुष्य जगले आहे पण तू मला जिवंत केलंस ! “अभिनेत्री” म्हणून ,एक तेजस्विनी पंडित आहे बरंका इथे अशी ओळख मला मी सिंधुताई सपकाळ ह्या चित्रपटाने दिली. अनेक आंतराष्ट्रीय, राष्ट्रीय पुरस्कार आम्ही पटकावले.
अभिमान वाटतो की ज्या कलाक्षेत्रात मी काम करते, त्यातून माईंचं हे महान कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा खारी चा का असेना पण मला वाटा उचलता आला. आणि एक व्यक्ति म्हणून त्यांचा तो अविस्मरणीय प्रवास मी स्क्रीनवर जगू शकले त्यातून बरेच काही शिकू शकले ह्याचा आनंद आहे. परकाया प्रवेश म्हणतात ना तेच! कळत नकळत खूप काही दिलं तुम्ही मला माई,” असे तेजस्विनी पंडितने म्हटले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App