विशेष प्रतिनिधि
पुणे : शाळा, आजोबा अशा दर्जेदार सिनेमांंमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा दिग्दर्शक म्हणजे सुजय डहाके. राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक सुजय सुनील डहाके आता त्याच्या नवीन सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा म्हणजे दिग्दर्शित ‘श्यामची आई’. या चित्रपटाच्या नव्या पोस्टरचं नुकतंच अनावरण करण्यात आलं.बहुचर्चित ‘श्यामची आई’ या चित्रपटाची निर्मिती अमृता अरुण राव यांची आहे. Shyamchi AAI new upcoming movie
View this post on Instagram A post shared by Marathibaabaa Network (@marathibaabaanetwork)
A post shared by Marathibaabaa Network (@marathibaabaanetwork)
श्मामची आई सिनेमाअमृता फिल्म्स निर्मित आणि आलमंड्स क्रिएशन प्रस्तुत ‘श्यामची आई’ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच जोरदार चर्चा सुरु आहे. साने गुरुजी यांच्या कादंबरीवर आधारित ‘श्यामची आई’ या चित्रपटाची संहिता प्रसिद्ध लेखक -दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांची आहे.तर सुपरहिट ‘पावनखिंड’ चित्रपटाचे निर्माते भाऊसाहेब , अजय , अनिरुद्ध आरेकर , आकाश पेंढारकर आणि विक्रम धाकतोडे हे प्रस्तुतकर्ता आहेत. यंदा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर ‘श्यामची आई’ हा चित्रपट आपल्या भेटीस येत आहे.
हे कलाकार साकारणार श्यामची आईची भूमिका ‘श्यामची आई’ या चित्रपटात ओम भूतकर यांनी साने गुरुजींची मध्यवर्ती भूमिका साकारली आहे तर सोबत गौरी देशपांडे, बाल कलाकार शर्व गाडगीळ,संदीप पाठक, ज्योती चांदेकर,सारंग साठ्ये,मयूर मोरे,उर्मिला जगताप,भूषण विकास,सुनिल अभ्यंकर , अक्षया गुराव अशी मोठी स्टारकास्ट पहायला मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App